Some societies are adamant about No entry to domestic workers 
पुणे

घरेलू कामगारांना प्रवेशबंदीबाबत काही सोसायट्या हट्टीच; 'येथे' करा तक्रार

सकाळवृत्तसेवा

पुणे :''महापालिका, राज्य सरकारने परवानगी दिल्यानुसार घरेलू कामगार आणि वृत्तपत्र वितरकांना प्रवेश द्यायचा की नाही, यामध्ये अनेक सोसायट्यांमध्ये अजूनही खल सुरू आहे. अनेक मोठ्या सोसायट्यांनी पुरेशी काळजी घेऊन घरेलू कामगार, वृत्तपत्र टाकणाऱयांना प्रवेश दिला असला तरी, काही सोसायट्यांनी त्यांची प्रवेशद्वारे अजूनही कामगारांना बंदच ठेवली आहेत. त्यामुळे नोकरदार महिला अडचणीत आल्या असून घरेलू कामगारांचीही आर्थिक कोंडी झाली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये घरेलू कामगारांना (मोलकरीण, ड्रायव्हर, गाड्या धुणारे आणि बागकाम करणारे कामगार) कामावर येण्यास महापालिकेने बंदी घातली होती. परंतु, सुमारे 10 दिवसांपूर्वी ही बंदी उठविण्यात आली आहे. त्यानुसार अनेक सोसायट्यांनी घरेलू कामगार, वृत्तपत्र वितरकांना परवानगी दिली आहे तर काही सोसायट्या अद्यापही त्यास तयार नाहीत. याबाबत सदस्यांच्या मागणीला सोसायट्यांचे पदाधिकारी त्याला विरोध करीत आहेत. त्यामुळे सोसायट्यांत वाद सुरू झाले आहेत. वर्क फ्रॉम होम करणाऱया महिलांचेही यामध्ये हाल होत असून घरेलू कामगारांचीही कुचंबना झाली आहे. वृत्तपत्र वितरकांनाही काही सोसायट्या परवानग्या देत नाहीत. त्यामुळे या बाबत आता महापालिका, राज्य सरकारनेच पावले उचलावीत, अशीही मागणी जोर धरू लागली आहे. शहर आणि परिसरात सुमारे दोन लाख घरेलू कामगार आहेत.
गुड न्यूज गुड न्यूज : कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा रेट मंदावतोय; वाचा सविस्तर आकडेवारी

''घरेलू कामगारांना कामावर जाण्यास कोणीही अटकाव केलेला नाही. पुरेशी काळजी घेऊन त्यांना प्रवेश देता येईल. या बाबत सोसाट्यांचे पदाधिकारी ऐकत नसेल तर, सदस्य नजीकच्या उपनिबंधक कार्यालयात तक्रार करू शकतील. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल''
- नारायण आघाव (जिल्हा उपनिबंधक)

''राज्य सरकार, महापालिकेने या बाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. सोसायट्यांमध्येच गैरसमज पसरले आहेत. त्याबाबत प्रशासनाने आवाज उठविला पाहिजे. पुरेशी काळजी घेऊन घरेलू कामगार काम करू शकतात, हे आता सुशिक्षितांना सांगण्याची वेळ आली आहे.''
- किरण मोघे, (अध्यक्ष- पुणे जिल्हा घरेलू कामगार संघटना)

सदस्यांमध्ये कोरोनाची अजून भीती आहे. आमच्या भागात प्रतिबंधित क्षेत्रातून घरेलू कामगार येतात. त्यामुळे त्यांना बंदी घालण्यात आली आहे. फक्त ज्यांची घरी काही प्रॉब्लेम आहेत, त्याची खातरजमा करून घरेलू कामगारांना तेथे प्रवेश देत आहे.
- बाळा सवाल (लेकटाउन सोसायटी, कात्रज) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

"तेव्हा माझ्यातला नवरा पुढे आला" उमेशने शेयर केला पुन्हा प्रियासोबत नव्या वेबसिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव

Numerology : 'या' 3 महिन्यात जन्मलेली व्यक्ती असते सगळ्यांची लाडकी; एका इशाऱ्यावर लोक त्यांच्यासाठी काहीही करतात

Farmer News : शेतकऱ्याचा जीव 'मुठीत' अन् वीज 'रात्री'त! माहूर तालुक्यात महावितरणच्या धोरणामुळे बळीराजा मृत्यूच्या छायेत.

SCROLL FOR NEXT