पुणे

आकाश पाटोळे यास अनुकंपा तत्त्वावर नोकरी

CD

सोमेश्वरनगर, ता. ५ : येथील सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थिप्रिय कर्मचारी सुनील पाटोळे यांचे गतवर्षी अचानक निधन झाले होते. त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर त्यांचा मुलगा आकाश सुनील पाटोळे याला विद्यालयाच्या सेवेत सामावून घेण्यात आले आहे. सोमेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते त्याला नियुक्ती आदेश देण्यात आला.

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व नीरा (ता. पुरंदर) येथील रहिवासी सुनील पाटोळे हे सोमेश्वर विद्यालयाचे कामसू कर्मचारी होते. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवर्गातही प्रिय होते. त्यांचे २३ एप्रिल २०२५ रोजी आकस्मिक निधन झाले आणि कुटुंब आर्थिक अडचणीत आले होते. सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाने आकाश पाटोळे याला कायम नोकरी मिळावी, यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी तातडीने प्रस्ताव पाठवला आणि पाठपुरावा केला होता. शिक्षण विभागाच्या आणि शिक्षण मंडळाच्या प्रयत्नाने एक वर्षाच्या आतच आकाश पाटोळे यास आदेश प्राप्त झाला. सोमेश्वर कारखान्याचे व शिक्षण मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते नियुक्ती आदेश आकाश पाटोळे यास नुकताच प्रदान करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, सचिव भारत खोमणे, मुख्याध्यापक पी. बी. जगताप उपस्थित होते. पाटोळे कुटुंबीयांनी व सुनील पाटोळे मित्रमंडळाने संस्थेचे आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: मुंबई-ठाणे-कल्याण प्रवास सुसाट होणार! खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल आणि वर मेट्रो धावणार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

T20 WC, IND vs ENG SF: भारत-इंग्लंड सामन्यासाठी वानखेडेवरील '७' नंबरची खेळपट्टी वापरली जाणार; २४ तासांत फिरला गेम... स्टेडियमवरून ताजे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : एसटी चालक आणि वाहकांची अल्कोहोल तपासणी बंधनकारक

Kolhapur Wrestling : कोल्हापूरच्या मातीचा गाजणार पुन्हा एकदा जलवा; कुंभी कारखान्याच्या कुस्ती स्पर्धेत ५०० हून अधिक पैलवान उतरणार आखाड्यात

Beed News : गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड? बर्दापूर पोलिसांची मोठी कामगिरी; मूर्ती फाट्याजवळ १० लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल पकडला, तिघांना बेड्या

SCROLL FOR NEXT