वडगाव निंबाळकर, ता. १२ : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत निंबूत-खंडाळा गट क्रमांक एकमध्ये काकडे यांनी आपले वर्चस्व कायम राखले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पुरस्कृत ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’चे अभिजित सतीश काकडे, प्रमोद भगवानराव काकडे आणि वसंतराव रामराव दगडे यांनी विजय मिळविला.
या गटात अभिजित सतीश काकडे यांना १४ हजार ३६, प्रमोद भगवानराव काकडे यांना १४ हजार ९६२, तर वसंतराव रामराव दगडे यांना १३ हजार ९८९ मते मिळाली. तिन्ही उमेदवारांनी विजय मिळवत पॅनेलचे प्रतिनिधित्व कायम ठेवले. माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखालील ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल’चे महेंद्र काशिनाथ काकडे यांना ६ हजार २७२, संतोष पोपटराव गायकवाड यांना ५ हजार ६१७, तर संभाजी मुगुटराव घाडगे यांना ५ हजार ४८५ मते मिळाली. युगेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुरस्कृत ‘श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’चे दत्तात्रेय रामराव चव्हाण यांना २ हजार ५८२, शंभूराजे सूर्यकांत काकडे यांना १ हजार ९७८, तर सुभाष नामदेव कोळेकर यांना १ हजार ८४८ मते मिळाली.
निंबूत-खंडाळा गटात तिन्ही पॅनेलच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये मोठी तफावत दिसून आली. विजयी पॅनेलच्या तिन्ही उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा लक्षणीय आघाडी घेतली. त्यामुळे या गटातील निकालाने सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत काकडे गटाचे वर्चस्व अधोरेखित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.