पुणे

‘सोमेश्वर’ची पहिली उचल आता ३४०० रुपये प्रतिटन

CD

सोमेश्वरनगर, ता. ३ : सोमेश्वर साखर कारखाना १ फेब्रुवारीपासून तुटणाऱ्या उसाला प्रतिटन ३४०० रुपये; तर १ मार्चपासून तुटणाऱ्या उसाला ३५०० रुपये प्रतिटन दर देणार आहे, अशी माहिती सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. तसेच, मंगळवारी (ता. ३) कारखान्याने जिल्ह्यात ११.५६ टक्के इतका सर्वोच्च उतारा राखत १० लाख क्विंटल साखरनिर्मितीचा टप्पा गाठल्याचेही सांगितले.
सोमेश्वर कारखान्याची एफआरपी (उसाची किंमत) प्रतिटन ३२८५ रुपये इतकी आहे. मात्र, हंगामाच्या सुरवातीपासून ३१ जानेवारीपर्यंत एफआरपीपेक्षा थोडी अधिक म्हणजे प्रतिटन ३३०० रुपये इतकी पहिली उचल अदा केली. दरम्यान, १ फेब्रुवारीपासून ज्यांचा ऊस तुटणार आहे, त्यांच्यासाठी पहिल्या उचलीसोबत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. त्यामुळे १ ते २८ फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाला प्रतिटन ३४०० रुपये, तर १ ते ३१ मार्चपर्यंत तुटणाऱ्या उसाला ३५०० रुपये प्रतिटन, असा दर शेतकऱ्यांना मिळणार आहे.
जगताप म्हणाले, ‘‘ही फक्त पहिली उचल आहे. यानंतर दिवाळीमध्ये शेतकऱ्यांना आतापर्यंतचा ऐतिहासिक दर मिळू शकणार आहे. अन्य कारखाने एफआरपीवर किंवा केवळ उचलीवर थांबतील. अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वरने उत्कृष्ट आर्थिक व तांत्रिक व्यवस्थापन केल्याने उच्चांकी दर देऊ शकणार आहे. त्यामुळे अन्य कारखान्यास ऊस घालून नुकसान करून घेऊ नये.’’ शेती अधिकारी बापूराव गायकवाड म्हणाले, ‘‘आडसाली ऊस संपला आहे. फक्त अडचणीतला राहिला आहे. पूर्वहंगामी ऊसतोड सुरू झाली आहे. अकराव्या व बाराव्या महिन्यातील खोडवा संपला आहे. जानेवारीच्या तोडी सुरू करत आहोत.’’

सर्वाधिक उतारा
सोमेश्वर कारखान्याने आजअखेर ८ लाख ७८ हजार टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी ११.५६, तर दैनंदिन १२.५८ टक्के हा उतारा जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट आहे. ७ कोटी ५५ लाख युनिट वीजनिर्मिती केली असून, ४ कोटी ९८ लाख युनिट वीजविक्री केली आहे. अल्कोहोलनिर्मिती ४४ लाख लिटर तर इथेनॉलनिर्मिती २६ लाख लिटर इतकी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईकर मेट्रोच्या प्रतीक्षेतच! मेट्रो-४ लांबणीवर, तर मेट्रो-२बी, ९चा गारेगार प्रवास कधी सुरू होणार? MMRDAची महत्त्वाची माहिती

Solapur Murder: भावाच्या घरात राहणाऱ्या पती-पत्नीचा खून

Solapur Maharashtra Kesari: महिला महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लास मिळणार कार; २८, २९ मार्च रोजी सोलापूर येथे रंगणार कुस्तीचा महासंग्राम

Mumbai Water Supply: सांडपाणी भागवणार मुंबईकरांची तहान, रिसायकल करून पाणी देण्याची BMCची योजना

Kolhapur Ambabai Temple : श्री अंबाबाईच्या ओटीत साडीऐवजी कागदाची रद्दी; भाविकांच्या श्रद्धेशी खेळ; प्रशासनाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT