ajit pawar someshwar sugar mill  sakal media
पुणे

Pune : सोमेश्वरच्या अध्यक्षपदाची उत्सुकता

उपमुख्यमंत्री अजित पवार सुचवतील त्यांनाच अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची संधी मिळणार आहे

सकाळ वृत्तसेवा

सोमेश्वरनगर : सोमेश्वर साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक अपेक्षेप्रमाणे एकतर्फीच होणार होती. मात्र, खरी उत्सुकता होती ती कारखान्याच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, या प्रश्नाची. अखेर ८ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता प्रशासनाने ही निवडप्रक्रिया निश्चित केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार सुचवतील त्यांनाच अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची संधी मिळणार आहे.

अध्यक्षपदाची धुरा मागील आठ वर्ष यशस्वीपणे सांभाळणारे आणि कारखान्यावरील कर्जाचा डोंगर उतरवून उच्चांकी भावाचा पायंडा पाडणारे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांना सर्वाधिक संधी असल्याचे मानले जाते. याशिवाय सन २००२ मध्ये तरुण वयात अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेले आणि त्यामुळेच सन २०११ ला पुन्हा अध्यक्ष बनलेले राजवर्धन शिंदे हेही अध्यक्षपदाच्या शर्यतीतील प्रबळ उमेदवार आहेत. माजी प्रशासकीय अधिकारी शिवाजीराव राजेनिंबाळकर यांच्या या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचीही चर्चा होत आहे. माजी उपाध्यक्ष सुनील भगत आणि विद्यमान उपाध्यक्ष शैलेश रासकर हेही यावेळी अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. ओबीसी आरक्षणावरून देशभर सुरू असलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावांची चर्चा होत आहे. दरम्यान, या नामांकित कारखान्याच्या अध्यक्षपदासोबत उपाध्यक्षपदही मानाचे मानले जाते. त्यासाठीही इच्छुकांनी फिल्डींग लावायला सुरुवात केली आहे.

पाच गटांमधील एकेकाला प्रत्येकी एका वर्षासाठी दिली जाईल, अशी चर्चा आहे. ज्येष्ठत्वाचा आणि पुरंदरला संधी देण्याचा विचार केल्यास विश्वास जगताप किंवा नीरा बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब कामथे यांचा विचार होऊ शकतो, तर समविचारी पक्षांचा विचार झाल्यास शेतकरी कृती समितीकडून संधी मिळालेले अभिजित काकडे किंवा काँग्रेसकडून अनंता तांबे यांना संधी मिळू शकते. अध्यक्षपद खुल्या गटाला जाण्याची शक्यता जास्त असल्याने अन्य प्रवर्गातील संग्राम सोरटे, आनंदकुमार होळकर, जिरायती भागातील किसन तांबे यांच्यापैकी एका नावाला पसंती मिळू शकते.

अजित पवार यांना निवडीचे सर्वाधिकार

कारखान्यातील सन १९९२ च्या सत्तांतरापासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार हेच संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांची निवड करतात. आताही त्यांनी संधी दिलेल्या मातब्बर मंडळींपैकी नेमके कोण अध्यक्ष-उपाध्यक्षपदावर विराजमान होणार हे ८ नोव्हेंबरला निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या होणाऱ्या सभेनंतर स्पष्ट होणार आहे. अजित पवार यांना निवडीचे सर्वाधिकार असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर त्यांचा निरोप घेऊन येतील आणि एकमताने निवड होईल, हे स्पष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT