सोमंथळीतील नवीन पुलाचे काम निकृष्ट
करंज ओढ्यावरील स्थिती; पुलाचा स्लॅब कोसळल्याने दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
सोमंथळी, ता. २२ ः येथील करंज ओढ्यावरील नव्याने बांधण्यात आलेल्या सिमेंट काँक्रिटच्या पुलाचे काम नुकतेच सुरू झाले आहे. सध्या या पुलावरवरील स्लॅबचे काम सुरू आहे, तो अचानकपणे कोसळल्याने सुरू असलेल्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सोमंथळी (ता. फलटण) येथील करंज ओढ्यावरील पुलाचे काम कित्येक वर्षे रखडले होते. या पुलाचे टिकाऊ व दर्जेदार काम व्हावे, यासाठी परिसरातील नागरिकांनी संघर्ष केला. या कामाला नुकतीच सुरुवात झाली असून, निधीही उपलब्ध झाला आहे. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
या पुलाचे काम सुरू असतानाच स्लॅब कोसळल्याने दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बांधकाम सुरू असलेला पूल जर कोसळत असेल, तर पूर्ण झाल्यानंतर कोसळणार नाही, याची गॅरंटी काय? असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
--------------------------------
कोट
सोमंथळी येथील करंज ओढ्यावरील सुरू असलेल्या नवीन पुलाच्या वरील मजल्यावरचा स्लॅब कोसळल्याने कामाबाबत शंका उपस्थित होत आहे. यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराकडून काम काढून घेऊन दुसरा ठेकेदार द्यावा, तसेच संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी.
- पोपट गोफणे, ग्रामस्थ, सोमंथळी.
---------------------------
01978
सोमंथळी : येथील ओढ्यावरील काम सुरू असलेल्या पुलाचा कोसळलेला स्लॅब. (दीपक मदने : सकाळ छायाचित्रसेवा)
---------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.