crime news
crime news sakal
पुणे

Pune Crime: धक्कादायक! तंबाखूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून डोक्यात खोरे घालून आईचा खून

सकाळ डिजिटल टीम

आताच्या घडीला देशाला हादरवून सोडणारी घटना घडली. वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीची दिल्लीत निर्घृण हत्या करण्यात आली. तरुणीचा लिव्ह-इन पार्टनर अफताब पूनावाला याने तिची हत्या करून शरीराचे 35 तुकडे करून ते जंगलात वेगवेगळ्या दिशेने फेकले. दरम्यान अशीच हादरवून सोडणारी घटना आपल्या जवळच्या परिसरात घडली आहे. एका 23 वर्षीय मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

हेही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

आईची हत्या करण्याचं कारण म्हणजे तंबाखू खायला आईने पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने आईचा जीव घेतला. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये घडली आहे. या क्रूर हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. आईच्या डोक्यात शेतकामासाठी वापरला जाणारा खोरा घालून मुलाने आईचा खून केल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. आईच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या मुलाचे वय 23 वर्ष आहे. मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

हत्या करण्यात आलेल्या आईचे नाव अंजनाबाई बारकु खिल्लारी असे आहे. त्या 60 वर्षांच्या होत्या. डोक्यात गंभीर झाल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला. तर अटक केलेल्या आरोपी मुलाचे नाव अमोल बारकु खिल्लारी (वय 23) असं आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिरोली तर्फे आळे इथे घडली आहे.

अमोल याने आपल्या आई अंजनाबाई यांच्याकडे तंबाखू विकत घेण्यासाठी पैसे मागितले. अंजानाबाई यांनी मुलाला पैसे देण्यास नकार दिल्याचा राग अमोलला आला. रागाच्या भरात त्याने आईच्या डोक्यात खोऱ्याचा घाव घातला आणि त्यात गंभीर जखमी झालेल्या अंजनाबाई यांचा मृत्यू झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT