Sonu Nigam night sakal
पुणे

Sonu Nigam Night : सोनू निगम यांच्या मैफिलीची उत्सुकता शिगेला

‘मॉडर्न रफी’ म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय गायक-संगीतकार सोनू निगम यांची मैफील पुण्यात शनिवारी (ता. ११) रंगणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘मॉडर्न रफी’ म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय गायक-संगीतकार सोनू निगम यांची मैफील पुण्यात शनिवारी (ता. ११) रंगणार आहे. सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित ‘सोनू निगम नाईट’ या विशेष मैफिलीची आता थोडीच तिकिटे शिल्लक राहिली आहेत.

शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता कोथरूड परिसरातील सूर्यकांत काकडे फार्म्स येथे ही मैफील रंगणार आहे. कोहिनूर ग्रुप (कृष्णकुमार गोयल एंटरप्राईज) हे या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक असून ॲबिज किचन हे फूड पार्टनर, ‘सूर्यकांत काकडे अँड असोसिएट्स’ हे व्हेन्यू पार्टनर आणि रेडिओ सिटी हे रेडिओ पार्टनर आहेत. ‘ॲमनोरा पार्क टाऊन’ यांचे सहकार्य या मैफिलीला लाभले असून ‘लाईट बल्ब’ आणि ‘शुभम आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग’ हे आउटडोअर पार्टनर आहेत. या मैफिलीची तिकीटविक्री सुरू झाल्यापासूनच तिकिटांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमासाठी आसन व्यवस्था ‘प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर असेल. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असतील.

सोनू निगम यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने आणि लोकप्रिय गीतांनी रसिकांना अनेक वर्षे मंत्रमुग्ध केले. त्यांनी आजवर सुमारे दहा वेगवेगळ्या भाषांमधील दोन हजारहून अधिक गाणी गायली आहेत. तसेच, विविध संगीत प्रकार हाताळत आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले. ‘संदेसे आते है’, ‘ये दिल दीवाना’, ‘कल हो ना हो’, ‘आज की रात’, ‘सतरंगी रे’, ‘अभी मुझ में कहीं’ यांसारखी त्यांनी गायलेली अनेक गाणी रसिकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. यातीलच काही गाणी प्रत्यक्ष ऐकण्याची संधी ‘सोनू निगम नाईट’ या कार्यक्रमात मिळणार आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करावा

या कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध असली, तरी त्याची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे कार्यक्रमाला येणाऱ्या अधिकाधिक नागरिकांनी मेट्रो, बस, कॅब यांसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करण्याचे आवाहन ‘सकाळ’ने केले आहे. कार्यक्रमस्थळापासून वनाज मेट्रो स्थानक हे अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असून बसथांबादेखील नजीकच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT