पुणे

पुणे - वनराज कृषी पर्यटन - (मिलिंद शेरकर, शिरोली, ता.जुन्नर जि.पुणे)

CD

सोनवारी पेस्टिंग

शेरकर दांपत्याचे नावारूपाला
आलेले वनराज कृषी पर्यटन केंद्र

पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील शिरोली येथील मिलिंद व वैशाली या शेरकर दांपत्याच्या शेतात कौटुंबिक मित्रपरिवारासाठी स्नेहभोजनाचे कार्यक्रम व्हायचे. याच कार्यक्रमाचे रूपांतर पुढे वनराज कृषी पर्यटन केंद्र उभारणीत झाले. अनेक आर्थिक अडचणींवर मात करीत, प्रतिकूल प्रसंगांना सामोरे जात या दांपत्याने केंद्राचा अत्यंत चांगल्या प्रकारे विकास केला.पर्यटकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विविध सोयी-सुविधा तयार करीत हे केंद्र आज नावारूपाला आले आहे. शेतीला या केंद्राचा मोठा पूरक आधार तयार झाला आहे.
................................................................
गणेश कोरे
.............................................
पुणे जिल्ह्यातील जुन्नर हा वनसंपदा, जैवविविधता यांनी संपन्न असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवनेरी ही जन्मभूमी, प्रसिद्ध भीमाशंकर स्थळ तसेच अन्य ऐतिहासिक व पर्यटन स्थळे या परिसरात असल्याने पर्यटक, अभ्यासकांची या भागात सातत्याने ये जा सुरू असते. साहजिकच कृषी पर्यटन केंद्र व्यवसायासाठी येथे मोठा वाव असल्याचे दिसून येते. तालुक्यातील शिरोली येथील मिलिंद बबन शेरकर यांनीही याच संधीचा पुरेपुर वापर करीत आपले कृषी पर्यटन केंद्र नावारूपाला आणले आहे. त्यांची एकत्रित कुटुंबाची साडेसात एकर शेती आहे. त्यात कांदा, सोयाबीन, मका, गाजर, टोमॅटो, ऊस अशी विविध पिके ते पारंपारिक पद्धतीने घेतात. त्यांचा मित्रपरिवारही मोठा आहे. सुमारे दहा- बारा वर्षांपूर्वी नववर्षानिमित्त त्यांनी आपल्या शेतात मित्रांसाठी स्नेहभोजनाचा बेत आखला होता. यावेळी पत्नी वैशाली यांनी अत्यंत चविष्ट स्वयंपाक दगडी चुलीवर केला. मित्रांनी या पदार्थांची प्रशंसा करताना वहिनीच्या हाताला उत्तम चव असून तुम्ही नियमितपणे अशा स्नेहभोजनाचे आयोजन करीत जा अशी विनंती मित्रपरिवाराकडून करण्यात आली. यातूनच पुढे भोजनासह शेतावरच निवासाची सोय असावी अशी मागणी होऊ लागली. त्यावेळी मिलिंद यांनी शेतीला पूरक व्यवसाय असावा म्हणून तयारी सुरू केली होती. त्यादृष्टीने पोल्ट्री शेड उभारले होते. मात्र भोजन व निवास अशी तात्पुरती सुविधा या शेडमध्येच तयार करण्यात आली.

कोरोना काळात गवसली संधी

कोरोना काळात अनेक बंधने आली. काही दिवस स्नेहभोजनाचे कार्यक्रम बंद झाले. अर्थात मिलिंद यांच्यासाठी पुढे हीच मोठी संधी ठरली. त्याचे त्यांनी सोन्यात रूपांतर झाले. परिसरात अत्यावश्‍यक सेवेसाठी आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना त्यावेळी निवासाची, भोजनाची कोणती सोय त्याकाळात हॉटेल किंवा लॉजच्या रूपाने उपलब्ध होत नव्हती. मुख्य रस्त्यापासून दूर आणि शांत ठिकाण असल्याने हे अधिकारी मिलिंद यांच्या शेतात भोजनासाठी येऊ लागले. अर्थात कोरोना लॉकडाउन मधील नियमावली पाळून शेरकर कुटुंब आपली सेवा देत होते. पर्यटन केंद्र सुरू करण्याचे महत्त्व एव्हाना मिलिंद यांच्या लक्षात आले होतेच. त्यांनी चार खोल्या बांधून निवासाची सुविधा उभारली. पुढे ‘माऊथ पब्लिसिटी’ वाढू लागल्यानंतर पर्यटन केंद्रावर गर्दी वाढू लागली. मग स्वतंत्र आचारी (कुक) ठेवला. काही दिवस त्याने चांगले कामही केले. मात्र एक दिवस आगाऊ काही लाख रुपयांची रक्कम घेऊन त्याने पोबारा केला. आकस्मिक झालेल्या या घटनेचा शेरकर कुटुंबाला मोठा धक्का बसला. अडचणी वाढल्या. मात्र अशाही परिस्थितीत मनोधैर्य खच्ची न करू देता मिलिंद यांची पत्नी वैशाली यांनी स्वयंपाकघराची पूर्ण जबाबदारी खांद्यावर घेतली. येणाऱ्या पर्यटकांना कोणतीही अडचण होणार नाही याची दक्षता घेतली.

पर्यटन केंद्राने घेतला आकार

हळूहळू पर्यटन केंद्र आकार घेऊ लागले. राज्यासह परराज्यांतून येणाऱ्या पर्यटकांकडून जलतरण तलाव (स्वीमिंग पूल) आणि जलक्रीडा अर्थात वॉटर स्पोर्ट्‌स ची मागणी होऊ लागली. मग शेततळ्यात प्लॅस्टिक पेपरचा वापर करून तलाव सुरू केला. वर्षभरात मिळालेल्या उत्पन्नातून चांगला स्वीमिंग पूल आणि मुलांसाठी जलक्रीडा सुविधा उभारली. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. शेतालगत ओढा वाहतो. तो पावसाळ्यात तुडूंब वाहत असला तरी पावसाळ्याचे पाणी ओसरल्यानंतर या ठिकाणी गर्द झाडीमध्ये नैसर्गिक पायवाट तयार होते. हीच जागा आज पर्यटकांसाठी मनःशांती केंद्र म्हणून तयार झाली आहे. पहाटे, सकाळी, दुपारी, सायंकाळी कधीही या परिसरात फिरले तरी पक्षांचा किलबिलाट आणि पाण्याच्या खळखळ आवाजाने पर्यटक सुखावतो. अनेक जण या परिसरात अनवाणी फिरण्याचा आनंद घेतात. ही मनःशांती आमच्या पर्यटन केंद्राची ‘युएसपी’ असल्याचे शेरकर सांगतात. पर्यटन केंद्रामध्ये स्थानिक खाद्यपदार्थांची लज्जत असते. यात पिठले भाकरी, शेवगा भाकरी, शेंगाळी, मासवडी अशा शाकाहारी तर चिकन, मटण, खेकडे, मासळी या रूपाने मांसाहारी पदार्थांची विविधता मिळते. सर्व स्वयंपाक चुलीवरचा असल्याने पर्यटक अस्सल ग्रामीण चव घेताना हरवून जातात. आज शेरकर यांचे विविध सोयीसुविधांनी सज्ज असे हे वनराज कृषी पर्यटन सर्वांचे आकर्षक ठरले आहे.

कर्ज न घेता आर्थिक नियोजन

पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी मिलिंद यांना शेतीतील उत्पन्नाचा आधार घ्यावा लागला. प्रसंगी पत्नीचे दागिने मोडून रक्कम उभी करण्याची वेळ आली. शिवाय दरवर्षी मिळेल तशा उत्पन्नातून एकेक सुविधा वाढवणे शक्य झाले. आजमितीला नऊ खोल्या बांधल्या असून दोन हॉल आहेत. मचाणसारखी सुविधा ओढ्यालगत केली आहे. दोन खोल्या ‘वॉटर स्पोर्ट’ सुविधेलगत आहेत. हा सर्व विकास करीत असताना एकही रुपयाचे कर्ज घेतले नसल्याचे शेरकर सांगतात.
........................................
कुटुंब चालवते पर्यटन केंद्र (इन्फो)

शेरकर यांचे १६ जणांचे कुटुंब आहे. यात वडील बबन, मिलिंद यांच्यासह दोन भाऊ, त्यांच्या पत्नी, मुले आदींचा समावेश आहे. भाऊ ट्रॅक्टर व्यवसायात असला तरी त्याची समर्थ साथ आहे. मिलिंद सांगतात की आमच्या परिसरात अष्टविनायकांतील ओझर, लेण्याद्री ही देवस्थाने तसेच शिवनेरी किल्ला आहे. पावसाळ्यात माळशेज घाट, नाणेघाट येथे येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. मुख्यतः पावसाळी पर्यटक आमच्यासाठी अधिक महत्त्वाचा ठरतो. कारण तो येथे मुक्कामासाठी येतो. शैक्षणिक सहली, वाढदिवस, कौटुंबिक स्नेहसंलन, स्नेहभोजन या कारणांसाठी येणारा पर्यटक हा देखील आमचा हक्काचा ग्राहक आहे. सोशल मीडियासह मौखिक प्रसिद्धीचा अधिक फायदा झाला आहे. शेरकर यांचा मुलगा शार्दूल फेसबुक, इन्स्टाग्राम आदींवर पर्यटकांच्या अनुभवाचे आणि पर्यटन केंद्रावर आधारित रिल्स सादर करत असतो. ते पाहूनही पर्यटक केंद्राकडे आकर्षित होत असल्याने शेरकर यांनी सांगितले.

पुणे -मिलिंद शेरकर- ९९७५६०३३७५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागला...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १०० नेते दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT