शिक्षण विभाग sakal
पुणे

पुण्यात लवकरच शिक्षण विभागासाठी स्वतंत्र इमारत होणार

बालचित्रवाणी’च्या जागेत साकारणार नवे शिक्षण आयुक्तालय

मीनाक्षी गुरव -GMinakshi_Sakal

पुणे: सध्या राज्यातील शिक्षण विभागाची सर्व प्रमुख कार्यालये ही पुण्यात विविध ठिकाणी विस्तारलेली असली, तरीही ही सर्व कार्यालये लवकरच एका छताखाली येणार आहेत. पुण्यातील ‘बालचित्रवाणी’च्या जागेत लवकरच शिक्षण विभागाची स्वतंत्र प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार असून या इमारतीत शिक्षण विभागाची सर्व कार्यालये स्थलांतर होणार आहेत.

शिक्षण विभागाची सर्व महत्त्वपूर्ण कार्यालये पुण्यात आहेत. यामध्ये शिक्षण आयुक्तालय, प्राथमिक शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, उपसंचालक व सहसंचालक कार्यालये, प्रौढ व अल्पसंख्याक शिक्षण विभाग, पुणे विभागीय उपसंचालक कार्यालय अशी शिक्षण विभागातील विविध कार्यालये पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी विस्तारलेली आहेत. मध्यवर्ती कार्यालयातील पहिल्या मजल्यावर शिक्षण विभागाची यातील काही कार्यालये सध्या आहेत. त्याशिवाय अन्य ठिकाणीही शिक्षण विभागाच्या कार्यालये आहेत. दरम्यान, शिक्षण विभागाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असला, तरीही सध्या असलेल्या कार्यालयाची जागा शिक्षण विभागासाठी अपुरी पडत आहे. सध्या असलेल्या कार्यालयाच्या विस्ताराच्या मर्यादा लक्षात घेता, शिक्षण विभागासाठी नवीन जागेचा विचार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.

त्याप्रमाणे बंद पडलेल्या ‘बालचित्रवाणी’च्या परिसरात शिक्षण विभागाची प्रशासकीय इमारत बांधण्याला मान्यता देण्यात आली आहे. या जागेतील एक एकर जागा छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणजेच ‘सारथी’चे कार्यालयासाठी दिली आहे. उर्वरित एक एकर जागेत शिक्षण विभागाची जवळपास सात-आठ मजली प्रशासकीय इमारत लवकरच उभी राहणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे.

‘‘शिक्षण विभागाची सर्व कार्यालये एकाच ठिकाणी असावीत. या दृष्टीने नव्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात येत आहे. बालचित्रवाणीच्या परिसरात दोन एकर जागा आहे. या आवारात एक एकर जागा ‘सारथी’च्या कार्यालयासाठी देण्यात आली आहे. तर उर्वरित एक एकर क्षेत्रात शिक्षण विभागाची प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. या संदर्भातील प्रस्तावाला शासनाची मान्यता मिळाली आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केली असून ती अंतिम टप्प्यात आहे.’’

विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT