पुणे

विजय चषक क्रिकेट बातमी

CD

PNE26W20397
सोलापूर ः विजेतेपदाच्या चषकासह साऊथ सोलापूर आपटे ग्रुपचा संघ, याप्रसंगी उपस्थित अशोक टिळक सर, प्रशांत बाबर व अन्य मान्यवर.

डॉ. आंबेडकर चषक स्पर्धेत साऊथ सोलापूर ठरला विजेता

तन्मय वाघमोडेच्या शतकाने श्री स्वामी समर्थ संघाचा १६७ धावांनी पराभव

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त साऊथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लबतर्फे आयोजित १२ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत साऊथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लबने विजेतेपद पटकावले. दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात तन्मय वाघमोडेच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर साऊथ सोलापूर संघाने श्री स्वामी समर्थ क्रीडा भारती क्रिकेट ॲकॅडमीचा १६७ धावांनी दणदणीत पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना साऊथ सोलापूर संघाने ४५ षटकांत ७ बाद ३३२ धावांचा भक्कम डोंगर उभा केला. तन्मय वाघमोडे याने १०३ तर वेदांत भोसले याने ९६ धावांचे मोलाचे योगदान दिले. श्री स्वामी समर्थ संघाकडून आदित्य चटके आणि अर्णव जोशी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
३३३ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना श्री स्वामी समर्थ क्रीडा भारती क्रिकेट ॲकॅडमीचा डाव अवघ्या १६५ धावांत आटोपला. त्यांच्याकडून यशराज शिंदे याने सर्वाधिक ३९ धावा केल्या, तर आदित्य चटके याने २२ धावांचे योगदान दिले. साऊथ सोलापूर संघाकडून फलंदाजीत चमकलेल्या तन्मय वाघमोडेने गोलंदाजीतही अष्टपैलू खेळ करत ४ गडी बाद केले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण साऊथ सोलापूर आपटे ग्रुप क्रिकेट क्लबचे सर्वेसर्वा अशोक टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी क्रिकेटपटू अनिल सांब्रानी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, रणजीपटू प्रवीण देशेट्टी, रोहित जोशी आदी उपस्थित होते.
---------------
वैयक्तिक पारितोषिक विजेते
उत्कृष्ट फलंदाज- तन्मय वाघमोडे
उत्कृष्ट गोलंदाज - आदित्य चटके
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक - नील कोंडा
मालिकावीर - तन्मय वाघमोडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

POCSO Case: अल्पवयीन विद्यार्थिनीचा हात पकडून लगट करण्याचा प्रयत्न, थेऊरमधील तरुणावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा

Nasarapur Crime : नसरापूर अत्याचार व खून प्रकरणाची आजपासून विशेष न्यायालयात सुनावणी; जलदगती न्यायालयात खटला चालणार

पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्यासोबत अर्धा तास दिलखुलास गप्पा; १९९१ची पुणे विमानतळावरील अविस्मरणीय पत्रकार भेट

Latest Marathi News Live Update : दिल्लीत २०२६ मधील विजेच्या मागणीचा उच्चांक नोंदवला गेला

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! दूध आणि भाज्यांवरुन ठरणार नवा पगार? 3490 कॅलरी फॉर्म्युला नेमका आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT