URA26A00424, URA26A00425
लोगो : दक्षिण सोलापूर तालुका
उसाचे क्षेत्र १२,७७७ हेक्टर;
पाच कारखान्यांसमोर संकट
सकाळ वृत्तसेवा
दक्षिण सोलापूर, ता. १ : दक्षिण सोलापूर तालुक्यातील साखर उद्योगाचा कणा समजल्या जाणाऱ्या सीना आणि भीमा नदीकाठच्या भागात आगामी साखर गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यात यंदा तीव्र दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, पाण्याची टंचाई आणि वाढलेली गाळप क्षमता यामुळे प्रत्यक्ष उपलब्ध उसाचे क्षेत्र अपुरे पडणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या अधिकृत नोंदीनुसार, दक्षिण सोलापूर तालुक्यात यंदा एकूण उसाचे क्षेत्र १२ हजार ७७७ हेक्टर नोंदवले गेले आहे.
हंगामनिहाय ऊस लागवड :
- आडसाली लागवड : १,३१५ हेक्टर (तालुक्यात दरवर्षी सरासरी ४,५०० हेक्टर क्षेत्रावर आडसाली लागवड होते, मात्र यंदाच्या दुष्काळामुळे यात मोठी घट झाली आहे).
- पूर्वहंगामी लागवड : १,२९९ हेक्टर
- सुरू हंगामी लागवड : १,१५३ हेक्टर
- खोडवा ऊस क्षेत्र : ९,०१० हेक्टर
कारखान्यांची दररोजची क्षमता १८ हजार मेट्रिक टन
दक्षिण सोलापूर तालुक्यात श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना (कुमठे), लोकमंगल साखर कारखाना (भंडारकवठे), लोकशक्ती शुगर (औराद), जय हिंद शुगर (आचेगाव) आणि गोकुळ शुगर (धोत्री) हे पाच साखर कारखाने कार्यरत आहेत. या सर्व कारखान्यांची एकत्रित प्रतिदिन गाळप क्षमता सुमारे १८,००० मेट्रिक टन एवढी अवाढव्य आहे. कारखान्यांच्या या एकूण गाळप क्षमतेचा ताळेबंद मांडल्यास, गाळप हंगाम पूर्ण दिवस चालवण्यासाठी तालुक्यात यंदा किमान ३,००० हेक्टर क्षेत्रावरील उसाची मोठी टंचाई भासणार आहे. त्यातच भर म्हणून, दुष्काळामुळे तीव्र चारा टंचाईचा प्रश्न समोर आला आहे. जनावरांच्या खाद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सीना-भीमा नदीकाठच्या आणि परिसरातील सुमारे ७०० हेक्टर क्षेत्रावरील ऊस हा प्रत्यक्ष गाळपाऐवजी जनावरांच्या चाऱ्यासाठी डायव्हर्ट होण्याची शक्यता आहे.
कोट..
दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याच्या उपलब्धतेअभावी यंदा आडसाली व सुरू लागवडीवर मोठा परिणाम झाला आहे. कारखान्यांची गाळप क्षमता पाहता स्थानिक ऊस अपुरा पडू शकतो. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन करून खोडवा व्यवस्थापनावर भर द्यावा.
- अवधूत मुळे, तालुका कृषी अधिकारी, दक्षिण सोलापूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.