पुणे

सोयाबीन खरेदीतील कथित फसवणूक प्रकरण; बाधित शेतकऱ्यांना पुढे येण्याचे तळबीड पोलिसांचे आवाहन

CD

सोयाबीन खरेदी फसवणूकप्रकरणी
शेतकऱ्यांनी संपर्क साधावा

तळबीड पोलिसांचे आवाहन; तपासाला मिळेल गती

उंब्रज, ता. ७ : तासवडे एमआयडीसीतील घाडगे-पाटील (नीलेश सदाशिव घाडगे) ॲग्रो फूड्स ॲण्ड श्रीशा मसाले या कंपनीकडून सोयाबीन खरेदी करूनही अनेक शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्याप्रकरणी तळबीड पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्याचा तपास सुरू असून, अशा प्रकारे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी पुढे येऊन तक्रार नोंदवण्याचे आवाहन तळबीडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी केले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तासवडे (ता. कऱ्हाड) एमआयडीसी येथील ॲग्रो फूड्स ॲण्ड श्रीशा मसाले या कंपनीने अनेक शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी केले होते; परंतु सोयाबीन विक्री केलेल्या काही शेतकऱ्यांना अद्याप पैसेच दिले नाहीत. या प्रकरणी संबंधित कंपनी व मालक नीलेश घाडगे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. यात अनेक शेतकरी या प्रकाराला बळी पडले आहेत. याची माहिती संकलित केली जात आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी या कंपनीकडे सोयाबीन विक्री केली आहे. मात्र, अद्याप मोबदला मिळाला नाही अथवा त्यांचीही फसवणूक झाली असल्यास त्यांनी तातडीने तळबीड पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
संबंधित शेतकऱ्यांनी तक्रार करताना सोयाबीन विक्रीची बिले, पावत्या, वाहतूक पावत्या, बँक खात्याचा तपशील, तसेच इतर संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या कागदपत्रांच्या आधारे तपासाला गती मिळणार असून, फसवणुकीची व्याप्ती समोर येण्यास मदत होईल.

..............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

Ladki Bahin Yojana August 2026 Installment GR : लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्याचा GR आला; खात्यात 1,500 जमा होणार की 3,000 शासन निर्णयात नेमकं काय?

Vinod Kambli ने ठाण्याच्या हॉस्पिटलमधून पोस्ट केला Video; प्रकृतीबाबत सांगायचं सोडून, काय बोलतोय ऐका; नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

SCROLL FOR NEXT