पुणे

उगवण क्षमता तपासूनच सोयाबीन पेरणी करा : नरवडे

CD

आळेफाटा, ता. २३ : ‘‘शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता घरच्या घरी तपासूनच पेरणी करावी,’’ असे आवाहन कृषी अधिकारी राजश्री नरवडे यांनी केले.
वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथे आयोजित चर्चासत्रात नरवडे बोलत होत्या. यावेळी त्यांनी सांगितले की, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाण्याची चाचणी करणे गरजेचे आहे. यामुळे पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्याचे प्रमाण निश्चित करता येते. चाचणीसाठी १०० दाणे ओल्या गोणपाटावर रांगेत ठेवून चार दिवस पाणी शिंपडावे. चार दिवसांनंतर अंकुरलेल्या बियांची संख्या मोजावी. जर ही संख्या ७० पेक्षा जास्त असेल, तर प्रति हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे.
पेरणीपूर्वी बियाण्यास प्रतिकिलो तीन ग्रॅम थायरम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. त्यानंतर रायझोबीयम आणि स्फुरद विरघळणाऱ्या जिवाणूंची २५० ग्रॅम प्रति १० किलो याप्रमाणे बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे. प्रथम बुरशीनाशक व नंतर जैविक खताची प्रक्रिया हलक्या हाताने करावी, असेही नरवडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Uruli Kanchan Ganpati Visarjan : उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास! मात्र डीजेला दिला मंडळानी फाटा

Beed News : करपलेली पिके अन् डोळ्यात अश्रू... बीडच्या बांधावर 'पालकमंत्री' सुनेत्रा पवार अन 'पंकजाताई मुंडे'

SCROLL FOR NEXT