किरकटवाडी: पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रामध्ये 'मलईदार' पोलीस ठाणे मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न करत असलेल्या जिल्ह्यातील अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या मनसुब्यांना पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी 'सुरुंग' लावला आहे. 31 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा पुणे जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहेत.
कोरोनामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या. जिल्ह्यातील अनेक पोलिस अधिकाऱ्यांची आपल्याला मनासारखे खाते मिळावे यासाठी धावपळ सुरू होती. कोणता पोलीस अधिकारी कोणते पोलीस स्टेशन घेणार याच्या चर्चा बदल्यांचा आदेश येण्याच्या अगोदरच सुरू झाल्या होत्या.
रात्री उशिरा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या सहीने बदल्यांचे आदेश जारी झाले आणि गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक पोलिस अधिकाऱ्यांना धक्का बसला. दि. 31 ऑक्टोबर 2020 रोजी झालेल्या आस्थापना मंडळाच्या बैठकीमध्ये विचार विनिमय करून पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत.
प्रशासकीय बदल्या(कोठून/कोठे)......
पो.नि. तयुब मुजावर (आळेफाटा पोलीस ठाण्यातून जिल्हा वाहतूक शाखा), पो.नि. सुनिल महाडिक (दौंड पोलीस ठाण्यातून जेजुरी पोलीस ठाणे), पो.नि. अशोक शेळके (हवेली पोलिस ठाण्यातून जिल्हा विशेष शाखा), पो.नि. सदाशिव शेलार (शिक्रापूर पोलीस ठाण्यातून हवेली पोलिस ठाणे), पो.नि. विनायक वेताळ (राजगड पोलीस ठाण्यात कायम), पो.नि. सतीशकुमार गुरव (खेड पोलिस ठाण्यात कायम), पो.नि. अरविंद चौधरी (कामशेत पोलीस ठाण्यात कायम), पो.नि. विठ्ठल दबडे (आर्थिक गुन्हे शाखेत कायम), पो.नि. दिलीप पवार (अहमदनगर ते लोणावळा शहर पोलीस ठाणे), पो.नि. नामदेव शिंदे (मुंबई शहर ते बारामती शहर पोलीस ठाणे), पो.नि. उमेश तावसकर (पिंपरी चिंचवड ते शिक्रापूर पोलीस ठाणे), स.पो.नि. निलेश माने (नवी मुंबई ते लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे), सपोनि प्रमोद पोरे(बारामती तालुका पोलीस ठाणे ते घोडेगाव पोलीस ठाणे), सपोनि ऋषिकेश अधिकारी (दौंड पोलीस ठाणे ते बारामती तालुका पोलीस ठाणे), सपोनि प्रदीप पवार (घोडेगाव पोलिस ठाणे ते यवत पोलीस ठाणे), सपोनि अजित जाधव (इंदापूर पोलीस ठाणे ते दौंड पोलीस ठाणे), सपोनि मिलिंद साबळे ( जुन्नर पोलीस ठाणे ते खेड पोलीस ठाणे), सपोनि निलेश बडाख (खेड पोलीस ठाणे ते जुन्नर पोलीस ठाणे), सपोनि वैभव स्वामी (लोणावळा शहर पोलीस ठाणे ते शिक्रापूर पोलीस ठाणे), सपोनि निरंजन रणवरे (लोणावळा ग्रामीण ते लोणी काळभोर पोलिस ठाणे), सपोनि प्रफुल्ल कदम (रांजणगाव एमआयडीसी ते कामशेत पोलीस ठाणे), सपोनि अतुल भोस(वाचक अपोअ, एक वर्ष मुदतवाढ), पोउपनि सुभाष मुंढे (बारामती शहर ते वालचंदनगर पोलीस ठाणे), पोउपनि पद्मराज गंपले(बारामती शहर ते यवत पोलीस ठाणे), पोउपनि प्रकाश खरात (दौंड ते लोणी काळभोर पोलिस ठाणे),पोउपनि तेजस मोहिते (दौंड ते इंदापूर पोलीस ठाणे), पोउपनि सुशील लोंढे (इंदापूर ते दौंड पोलीस ठाणे),पोउपनि विजय वाघमारे (जेजुरी ते दौंड पोलीस ठाणे), पोउपनि स्मिता नवघरे (जुन्नर ते नारायणगाव पोलीस),पोउपनि मृगदीप गायकवाड (लोणावळा ते पौड पोलीस ठाणे), पोउपनि शिवाजी ननवरे (लोणी काळभोर ते स्थानिक गुन्हे शाखा), पोउपनि हनुमंत पडळकर ( लोणीकंद ते शिरूर पोलीस ठाणे), पोउपनि अनिल लवटे (पौड ते लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे), पोउपनि रेखाबाई दूधभाते (पौड ते लोणीकंद पोलीस ठाणे), पोउपनि संदीप गोसावी (वाचक, बारामती ते लोणावळा शहर पोलीस ठाणे), पोउपनि प्रकाश शितोळे (वाचक ,लोणावळा येथे सेवानिवृत्ती पर्यंत मुदतवाढ), पोउपनि रावसाहेब रानवर(वाचक, हवेली ते वाचक, बारामती), पोउपनि भगवान पालवे (शिरूर ते बारामती शहर पोलीस ठाणे), पोउपनि संजयकुमार धोतरे(वालचंद नगर ते इंदापूर पोलीस ठाणे), पोउपनि सदाशिव जगताप ( वालचंद नगर ते बारामती शहर पोलीस ठाणे), पोउपनि नितीन लकडे (यवत ते वालचंदनगर पोलीस ठाणे) पो.नि. औदुंबर पाटील (बारामती शहर ते सायबर पोलीस ठाणे), पो.नि. युवराज मोहिते (जुन्नर ते आर्थिक गुन्हे शाखा), पो.नि. दगडू हाके (सासवड ते आर्थिक गुन्हे शाखा), सपोनि विनायक देवकर (वेल्हा ते शिक्रापूर पोलीस ठाणे).
विनंती बदल्या...
पो.नि. नारायण पवार (जिल्हा विशेष शाखा ते दौंड पोलीस ठाणे), पो.नि. अण्णासाहेब घोलप (बारामती तालुका सासवड पोलीस ठाणे), सपोनि मनोज पवार (यवत ते वेल्हा पोलीस ठाणे).
वरील प्रमाणे पुणे जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या असून बदली करण्यात आलेल्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ रुजू होण्यास सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.