Pune Katraj Dairy  sakal
पुणे

Katraj Dairy : कात्रज डेअरीच्या विस्तारीकरणासाठी जागा आवश्‍यक

पुणे महापालिकेचा डीपी करताना २०१५ मध्ये कात्रज डेअरीच्या जागेवर खेळाच्या मैदानाचे आरक्षण टाकण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यातील (डीपी) मैदानाचे आरक्षण उठवून ही जागा पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) वापरासाठी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यास विरोध होत असताना त्यावर दूध संघातर्फे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ही जागा पूर्वीपासून कात्रज डेअरीचीच आहे.

या ठिकाणी डेअरीच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प प्रस्तावित असल्याने ही जागा आवश्‍यक असल्याने विकास आराखड्यात बदल केला जात आहे. आम्ही कायमच पुण्याच्या विकासासाठी सहकार्य केले आहे. सातारा रस्ता व कात्रज चौक ते मैत्री चौक या दरम्यान रस्ता रुंदीकरणासाठी ४ एकर जागा दिली आहे असे दूध संघातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे महापालिकेचा डीपी करताना २०१५ मध्ये कात्रज डेअरीच्या जागेवर खेळाच्या मैदानाचे आरक्षण टाकण्यात आले होते. त्यावेळी महापालिका आयुक्त, नगररचना संचालक, नगरअभियंता यांच्या त्रिसदस्यीय समितीने हे आरक्षण काढून टाकून हा भाग निवासी केला होता. मात्र, २०१६ च्या सुधारित विकास आराखड्यामध्ये महापालिकेने पुन्हा खेळाच्या मैदानाचे आरक्षण टाकले.

तसेच या जागेतून १२ मिटर ऐवजी २४ मीटरचा रस्ता प्रस्तावित केला. या जागेत डेअरीचे विस्तारीकरण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ७४ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. पण मैदानाच्या आरक्षणामुळे या कामात अडथळा निर्माण झाला असल्याने शासन व महापालिकेकडे पाठपुरावा करून हे आरक्षण उठविण्यासाठी कार्यवाही केलेली आहे.

शासनाकडून दूध संघास जागा

राज्य शासनाने १९६९ मध्ये ही जागा दूध संघास दुग्धजन्य पदार्थ उत्पादन व निर्मितीसाठी दिलेली आहे. २०१३ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा दूध संघाच्या नावाने केली. या जागेत प्रशासकीय इमारत, उत्पादन प्रक्रिया प्लांट, सर्व्हीसेस ब्लॉक इमारत, खरेदी व स्टोअर इमारत, प्रशिक्षण केंद्र कामगार वसाहत, गोठा आदीचा समावेश आहे, असे दूध संघातर्फे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT