radio galaxy  sakal
पुणे

तुम्हालाही करता येणार अवकाश संशोधन

विज्ञान दिनी एक दशलक्ष आकाशगंगा उपक्रमाची सुरवात

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दुर्बिणीतून चंद्र पाहिल्यावर बहुतेकांना खगोलशास्रज्ञ बनून काही तरी भन्नाट शोध लावण्याची इच्छा नक्कीच झाली असेल. पण, अवघड समीकरणे आणि डोक्यावरून जाणारे सिद्धांत पाहता अनेकांची ही इच्छा अपूर्णच राहीली असेल. मात्र, आता एक सुवर्णसंधी चालून आली आहे. एका महाशोधाचा भाग बनण्याची आणि चक्क हौशी खगोलशास्रज्ञ होण्याची. पुणे ज्ञान समुहाच्या वतीने येत्या विज्ञान दिनी म्हणजेच २८ फेब्रुवारीला ‘एक दशलक्ष आकाशगंगा’ नावाचा उपक्रम सुरु करण्यात येत आहे.

उपक्रमाची पार्श्वभूमी काय?

जगभरातील खगोलीय दुर्बिणींकडे निरीक्षणातून महाकाय माहितीकोष (डेटासेट) तयार होतो. या सर्व माहितीचे पृथक्करण करणे शास्रज्ञांना शक्य होत नाही. अशा वेळी सर्वसामांन्याना समजेल अशा स्वरूपात माहितीची मांडणी करून स्वयंस्फूर्तीने नागरिकांकडून डेटाचे विश्लेषण करून घेतले जाते. याला हौशी खगोलसंशोधन असेही म्हटले जाते.

काय आहे उपक्रम?

वैज्ञानिकांकडे अब्जावधी दीर्घीकांचे छायाचित्र आहे. मात्र या दीर्घीकांची वैशिष्ट्ये शोधण्यासाठी कोणत्याच प्रकारचा अल्गॉरिदम किंवा कृत्रीम बुद्धिमत्तेचा आधार घेता येत नाही. अशा वेळी प्रत्येक छायाचित्र पाहून दीर्घीकेचा प्रकार आणि वैशिष्‍ट्ये निश्चित करावी लागतात. त्यामुळे जगभरात नागरिकांच्या मदतीने या अब्जावधी दीर्घीकांचे विश्लेषण करण्यात येत आहे. त्याचा भाग म्हणून पुणे ज्ञान समुहाच्या वतीने एका संकेतस्थळावर ही सर्व छायाचित्रे उपलब्ध करून दिली आहे. ज्यात नागरिकांच्या सहभागाने माहितीचे पृथ्थकरण होईल.

नागरिकांना काय करायचे आहे?

संकेतस्थळावर आपले खाते तयार करायचे आहे. तिथेच आपल्याला दीर्घीकांच्या प्रकारानुसार छायाचित्र दिले आहे. ते पहायचे आणि समजून घ्यायचे. त्यासाठी आवश्यक सर्व माहिती संकेतस्थळावर दिली आहे. एका ऑनलाइन खेळाप्रमाणे आपल्याला छायाचित्र उपलब्ध होतील. त्याच्या निरीक्षणाच्या आधारे त्याचा प्रकार क्लिक करायचा आहे. असं करत आपण विश्वातील दीर्घीकांचा प्रकार निश्चित करत माहितीचे विश्लेषण करत जाऊ.

संकल्पना कोणाची?

भारतीय खगोलभौतिकी संस्थेचे (आयएयु) प्रा. सुधांशू बर्वे आणि खगोलशास्रज्ञ डॉ. अजित केंभावी यांची ही संकल्पना आहे. या उपक्रमात डॉ. दिशा सावंत, आयसर भोपाळचे अथर्व बागूल, आयआयटी मुंबईचे अनिश देशपांडे, आयसर तिरुपतीची निकिता बलोधी, कदिर पठाण यांचा समावेश आहे.

संकेतस्थळ : http://pkc.org.in/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT