YSH26B05136
अकलूज (ता. माळशिरस) : महर्षी प्रशालेत चिमणी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना पक्ष्यांसाठी विविध साधने बनवायचे प्रात्यक्षिक करून दाखवताना प्रा. देशमुख. यावेळी उपस्थित मुख्याध्यापक संजय गळीतकर व मान्यवर.
---
‘चिमण्यांचे संवर्धन करणे
गरजेचे : प्रा. धनंजय देशमुख
अकलूज, ता. २० : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी चिमणीसारख्या लहान पक्ष्यांचे संवर्धन अत्यंत गरजेचे आहे, असे मत पक्षीमित्र प्रा. धनंजय देशमुख यांनी व्यक्त केले.
महर्षी प्रशालेत जागतिक चिमणी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक संजय गळीतकर, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य अनिल जाधव, पर्यवेक्षक उमेश बोरावके, ज्येष्ठ शिक्षक राजाराम काळे, शिक्षिका भाग्यश्री उरवणे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्लास्टिक प्लेट, बाटल्या, लाकडी बॉक्स व पाइप यांच्या साहाय्याने पक्ष्यांसाठी निवारा, अन्न व पाण्याची साधने कशी तयार करावीत, याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
प्रा. देशमुख यांनी चिमण्यांची संख्या घटण्यामागील कारणे स्पष्ट करताना शहरीकरण, अन्नसाखळीतील बदल, कीटकांची घट व घरट्यांसाठी जागेचा अभाव यांचा उल्लेख केला. चिमण्या कीटकांवर उपजीविका करत असल्याने नैसर्गिक कीटक नियंत्रणात त्यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश सोनवणे यांनी केले, तर आभार बिभीषण जाधव यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.