Caste-Certificate 
पुणे

महत्त्वाची बातमी : जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम 1 एप्रिलपासून!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या वतीने जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी काही उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यानिमित्ताने 1 एप्रिल ते 30 जून 2020 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती 'बार्टी'चे महासंचालक कैलास कणसे यांनी दिली. 

ज्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे, अशा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्यातील सर्व जिल्हा जात पडताळणी समित्यांना विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेच्या कालावधीत जवळपास सर्व प्रकरणे निकाली काढण्यात येतील.

ज्या प्रकरणांमध्ये त्रुटी आहेत, त्या विद्यार्थ्यांना कळवून त्रुटींची पूर्तता करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना 31 मेपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही, अशा विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे त्रुटींची पूर्तता करावी. त्यासाठी आवश्‍यक पुरावे आणि मूळ कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन कणसे यांनी केले आहे. 

तक्रार निवारण कक्ष : 

टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक : 18002330444 
व्हॉटस्‌ऍप क्रमांक : 9404999452 किंवा 9404999453 
ई-मेल आयडी : query-CCVI@barti.in 
संकेतस्थळ लिंक : https:barti.maharashtra.gov.in/ECasteValidation/CCVIS

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे हादरलं! बालाजीनगरात भरदिवसा आंदेकर टोळीचा गोळीबार, आरोपीच्या भावाची हत्या

IPL 2026, LSG vs RR: 'पराभूत झालो, तरीही आमचा संघ...', रिषभ पंतची 'F' ची भाषा, पराभवानंतर ऑन कॅमेरा दिली शिवी; VIDEO

Gold Rate Today: पेट्रोल-डिझेलनंतर आता सोनंही महागलं! काय आहे ताजा भाव?

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीने शेअर बाजार हादरला! सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स घसरले?

Nagpur News: उष्ण लाटेमुळे ७६ रुग्णांची नोंद; हीट रॅश, हीट एक्झाॅशन वाढले; आरोग्य यंत्रणा ॲलर्टवर

SCROLL FOR NEXT