Pune Municipal Corporation sakal
पुणे

पुणे स्थायी समितीचे नवे सदस्य निवडीसाठी सोमवारी खास सभा

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत २८ फेब्रुवारीला संपणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत २८ फेब्रुवारीला संपणार आहे.

पुणे - महापालिकेच्या (Pune Municipal) स्थायी समितीच्या (Standing Committee) आठ सदस्यांची मुदत २८ फेब्रुवारीला संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या आठ जागांवर सदस्यांची निवड (Selection) करण्यासाठी सोमवारी (ता. २१) खाससभा (Meeting) आयोजित करण्यात आली आहे. अवघ्या १४ दिवसांसाठी हे सदस्य असणार असल्याने नेमकी यामध्ये कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता वाढली आहे.

स्थायी समितीच्या सदस्यांचा कालावधी दर दोन वर्षांनी संपतो, यामध्ये भाजपचे ४, राष्ट्रवादीचे २, तर कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका सदस्यांचा कालावधी २८ फेब्रुवारी रोजी पूर्ण होणार आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या महापालिकेची मुदत १४ मार्च रोजी संपणार आहे, तो त्यापूर्वी आचारसंहिता लागू झाली नाही तर महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती होईल. दरम्यान स्थायी समितीच्या ८ सदस्यांची मुदत संपत असताना पुन्हा निवडणूक घेण्याऐवजी त्यांना १४ दिवसांसाठी मुदतवाढ देता येते का ? याचा विचार झाला, पण महापालिकेच्या विधी विभागाने निवडणूक घ्यावी लागले असा अभिप्राय दिला आहे.

त्यामुळे आता ही निवडणूक घेण्यासाठी २१ फेब्रुवारी दुपारी ३ वाजता खास सभा बोलविण्यात आली आहे. १४ दिवसांसाठी पक्षाकडून नव्यांना संधी मिळेल की पुन्हा त्याच नगरसेवकांना संधी मिळेल हे पहावे लागणार आहे. ही निवडणूक झाल्यानंतर ७ मार्चपूर्वी अध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी लागणार आहे.

या सदस्यांची संपणार मुदत

  • भाजप - मानसी देशपांडे, सुनीता गलांडे, वर्षा तापकीर, उज्वला जंगले,

  • राष्ट्रवादी कॉंग्रेस- नंदा लोणकर, अमृता बाबर

  • शिवसेना - बाळासाहेब ओसवाल

  • कॉंग्रेस - लता राजगुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमारांना हटवणं सोपं नाही, नोटीस ते राष्ट्रपतींच्या आदेशापर्यंत अनेक टप्पे; कशी असते प्रक्रिया?

Bike Accident : बिडकीन–शेकटा मार्गावर भीषण अपघात! दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; नातेवाइकांकडून घातपाताचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

Satana Ganpati Visarjan : सटाण्यात अभूतपूर्ण जल्लोषात गणरायाला निरोप! शहराच्या इतिहासात प्रथमच उशिरा विसर्जन मिरवणूक

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

SCROLL FOR NEXT