‘बीएलओं’ना घरातील व्यक्तींची अचूक माहिती द्या
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन; विशेष सखोल पुनरिक्षणाबाबत राजकीय पक्षांची बैठक
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २६ : मतदार याद्यांच्या अचूकतेसाठी विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येत असून, ३० जून ते २९ जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी भेट देणार आहेत. नागरिकांनी मतदार प्रगणन अर्ज भरताना आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, उपजिल्हाधिकारी लक्ष्मण कसेकर, निवडणूक तहसीलदार विभुते यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्तिकेयन म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक पात्र मतदारापर्यंत प्रगणन अर्ज पोचवून तो भरून घेतला जाणार आहे. अर्जामध्ये मतदारांची माहिती, नकाशीकरण (मॅप), अनमॅप व विसंगती (अॅनॉमली) याबाबतची माहिती तपासली जाणार असून नागरिकांनी अचूक माहिती व आवश्यक पुरावे सादर करावेत.
बैठकीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नियुक्त करण्याची सूचना केली. तसेच बीएलओंनी नागरिकांशी नियमित संपर्क ठेवावा, आवश्यक कागदपत्रांची माहिती व्यापकपणे द्यावी, एकाच कुटुंबातील मतदारांची नावे एकाच मतदान केंद्रावर राहतील याची दक्षता घ्यावी आणि दुबार नोंदणी टाळावी, अशा सूचना प्रशासनाला करण्यात आल्या.
चौकट
एसआयआर कार्यक्रम
पात्रता तारीख : १ ऑक्टोबर २०२६
बीएलओंच्या घरोघरी भेटी : ३० जून ते २९ जुलै
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध : ५ ऑगस्ट
दावे-हरकती : ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध : ७ ऑक्टोबर
आवश्यक कागदपत्रे
जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, दहावी अथवा शैक्षणिक प्रमाणपत्र, कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, शासकीय ओळखपत्र, निवृत्तीवेतन आदेश, जमीन अथवा घर वाटप प्रमाणपत्र, वनहक्क प्रमाणपत्र, कौटुंबिक नोंदवही आदी कागदपत्रांपैकी आवश्यक पुरावे सादर करता येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.