transgender
transgender sakal
पुणे

पुणे : तृतीयपंथीयांसाठी विशेष मतदार नोंदणी मोहिम

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहर व जिल्ह्यातील तृतीयपंथियांसाठी येत्या रविवारपासून (ता. २७) आठवडाभर विशेष मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय तृतीयपंथीय ओळख दिनानिमित्त या खास मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यानुसार २७ मार्च ते २ एप्रिल २०२२ या कालावधीत या विशेष मोहिमेची अंमलबजावणी केली जाणार आहे.

या विशेष नोंदणी मोहिमेत पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात तृतीयपंथियांची मतदार नोंदणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.दरवर्षी ३१ मार्च हा दिवस जागतिक तृतीयपंथी ओळख दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने तृतीय पंथीयांची मतदार नोंदणी करताना त्यांच्याकडील कागदपत्रांची कमतरता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने त्यांना कागदपत्रांबाबत सवलत दिली आहे.

यानुसार १८ ते २१ या वयोगटातील तृतीयपंथी नागरिकांकडे वयाचा पुरावा नसल्यास त्यांना गुरू माँ ने दिलेले प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच २१ वर्षावरील तृतीयपंथी व्यक्तीने स्वत:चे वय सांगणारे दिलेले प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT