Suyog Tapkir and Sumit Tapkir sakal
पुणे

Speed Skating Competition : 'खेलो इंडिया' स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुयोग व सुमित तापकीर बंधूंची मोलाची कामगिरी

गुलमर्ग येथे १० ते १४ फेब्रुवारी रोजी खेलो इंडिया २०२३ च्या हिवाळी स्पीड स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

शीतल बर्गे

गुलमर्ग येथे १० ते १४ फेब्रुवारी रोजी खेलो इंडिया २०२३ च्या हिवाळी स्पीड स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

बालेवाडी - गुलमर्ग येथे १० ते १४ फेब्रुवारी रोजी खेलो इंडिया २०२३ च्या हिवाळी स्पीड स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या बाणेर बालेवाडीचे सुपुत्र सुयोग तापकीर याने दोन सुवर्णपदके, तर याचाच लहान भाऊ सुमित तापकीर यांने एक रौप्य पदक पटकावून आपल्या खेळाचे शानदार प्रदर्शन केले.

गुलमर्ग येथे पार पडलेल्या खेलो इंडिया स्पीड स्केटिंग स्पर्धेत महत्त्वाच्या असलेल्या खुल्या गटात सुयोग तापकीर याने ५०० मीटर व १००० मीटर या स्पर्धेत दोन सुवर्ण पदके तर सुमित तापकीर याने ५०० मीटर स्पर्धेत एक रौप्यपदक मिळवून विजयाची सलामी दिली. यांच्या या यशानंतर इंडिया आइस स्केटिंग चे अध्यक्ष अमिताभ शर्मा यांनी सुयोग व सुमितला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बाणेर बालेवाडी येथील यंग स्टर स्पोर्ट्स क्लबचे प्रशिक्षक संजोग तापकीर या त्यांच्या मोठ्या भावाच्या मार्गदर्शनाखालीच सुयोग व सुमित सराव करतात. भारती विद्यापीठमध्ये शिक्षण घेऊन या दोघांनी २००९ पासून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या सरावाच्या जोरावर अनेक पदके पटकावली आहेत. सुयोग हा भारताचा पहिला ज्युनिअर वर्ल्डकप खेळणारा खेळाडू आहे. यावर्षी सुद्धा १८ व्या राष्ट्रीय स्पर्धेत सुमित ने सुवर्णपदक मिळवले. या भावांच्या कौतुकास्पद कामगिरी मध्ये त्यांची आई सुनंदा तापकीर यांचे फार मोठे योगदान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT