speed for voting from afternoon in Hadapsar constituency
speed for voting from afternoon in Hadapsar constituency  
पुणे

पुण्यातल्या हडपसर मतदारसंघात दुपारनंतर मतदानास वेग

सकाळ वृत्तसेवा

पुणे : हडपसर विधानसभा मतदार संघात गाडीतळ माळवाडी परिसरात मतदारांचा उत्साह दिसून आला. मात्र मगरपट्टा सिटी येथील लक्ष्मी नगर प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर दुपारी बारापर्यंत मतदार मतदान कमी झाल्याचे दिसून आले. सकाळी अकरा वाजेपर्यंत या मतदारसंघात 12.71 टक्के मतदान झाले आहे.

हडपसर मतदार संघात सकाळी पाऊस नसला तरी मतदारांमध्ये उत्साह कमी होता. साडे अकरा वाजेपर्यंत मतदानाचा प्रमाण कमी होते. त्यानंतर हडपसर माळवाडी येथील साधना विद्यालयाच्या आवारात मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. मगरपट्टा सिटी येथील आयटी कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर मतदानासाठी रांगा लागल्याचे दिसून आले. रामटेकडी येथील परिसरातही सकाळी मतदारांची फारशी गर्दी नव्हती. दुपारी बारा नंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. 

निवडणूक आयोगाकडून ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच मतदान केंद्रावर दिशादर्शक फलक लावल्यामुळे मतदारांना सोयीचे झाले. परंतु मतदान केंद्रांच्या बाहेर वाहनांच्या पार्किंगसाठी सुविधा नव्हती. त्यामुळे रस्त्याच्या कडेला वाहने लावल्याचे दिसून येत होते. तसेच, काही मतदारांना प्रशासनाकडून वोटर स्लीप मिळालेल्या नव्हत्या.त्यामुळे काही मतदारांना त्यांची मतदार यादीत नावे शोधण्यासाठी बराच वेळ लागत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT