दावडी, ता. २२ : खरपुडी बुद्रुक (ता. खेड) येथे मसालेभात खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांना अन्नातून विषबाधा झाली. शुक्रवारी (ता. १९) घडलेल्या या घटनेतील बाधितांवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
वसंत बबन चौधरी (वय ५८), विद्या वसंत चौधरी (वय ४७), सुरज वसंत चौधरी (वय २६) आणि ऋतुजा सुरज चौधरी (वय २१) अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत. चौधरी कुटुंबाने शुक्रवारी सायंकाळी घरी मसालेभात खाल्ला होता. त्यानंतर रात्रीपासूनच त्यांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. शनिवारी सकाळी सर्वांना चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्रास वाढल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
वसंत चौधरी यांच्यावर राजगुरुनगर येथील साळुंके हॉस्पिटलमध्ये, तर उर्वरित तिघांवर चाकण येथील कोअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. वसंत चौधरी यांची प्रकृती चिंताजनक होती; मात्र आता स्थिर असल्याची माहिती डॉ. रोहन साळुंके यांनी दिली. अन्य तिघांच्या प्रकृतीतही सुधारणा होत असून त्यांना लवकरच घरी सोडले जाईल, असे डॉ. प्रणव देशमुख यांनी सांगितले.
पावसाळ्यात शिळे अन्न तसेच फ्रिजमध्ये दीर्घकाळ ठेवलेले अन्न खाणे टाळावे. पिण्याचे पाणी उकळून वापरावे. उलट्या, जुलाब किंवा ताप यांसारखी लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- पूनम चिखलीकर, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, चांडोली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.