Pune NCP News esakal
पुणे

NCP: पुण्यात राष्ट्रवादीमध्ये फूट; दिलीप वळसे पाटील पाटलांचे समर्थन देवदत्त निकम यांचा वेगळा पॅनल

रुपेश नामदास

Pune NCP News: पुण्यात राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याचे चित्र पाहिला मिळत आहे. पुण्यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी गृह मंत्री दिलीप वळसे पाटील पाटल यांचे समर्थन देवदत्त निकम यांनी या निवडणुकीत वेगळी चूल मांडली आहे.

निकम यांनी वेगळा पॅनल उभा केला आहे. त्यामुळे देवदत्त निकम यांची पक्षातून हकलपट्टी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षाचा आदेश न मानता निकम यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे.

दरम्यान मंचर बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकसंघ असणाऱ्या आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसध्ये गटबाजी उफाळून आली आहे.

माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक देवदत्त निकम यांनाच पक्षाने उमेदवारी नाकारण्यात होती. देवदत्त निकम यांनी मात्र आपण दिलीप वळसे पाटील यांचा फोटो वापरून अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले होते. (Latest Marathi News)

तर ‘आपण माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा फोटो वापरून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार आहे. असं त्यांनी जाहीर केलं होतं. ते म्हणाले होते की, “राष्ट्रवादी पक्षातील सर्व इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरणे, त्यांच्या मुलाखती घेणे. या सर्व प्रक्रियेत मी होतो. पण मला उमेदवारी नाकारल्याने दुःख झाले असून मानसिक धक्का बसला आहे.

दरम्यान बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक ठिकानी राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाल्याचे पाहिला मिळालं. तर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपच्या नेत्यांशी युती करून आपल्याच पक्षातील नेत्यांना आव्हान दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT