sport players not allowed but dol tasha practice allowed in sanas ground pune sakal
पुणे

Pune News : खेळाडूंना बंदी पण ढोलवादनाला परवानगी; सणस क्रीडांगण कशासाठी?

गणेशोत्सव जवळ आल्याने ढोल ताशा पथकांनी मोकळ्या जागा, नदी पात्र यासह इतर ठिकाणी सराव सुरू

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून स्वारगेट येथील कै. बाबूराव सणस क्रीडांगणात तयार केलेल्या सिंथेटिक ट्रॅकवर खेळाडूंना सरावासाठी परवानगी दिली जात नाही. मात्र, दुसरीकडे ढोल ताशा पथकांना थेट मांडव घालून या परिसरात सराव करत आहेत. त्यामुळे सणस क्रीडांगण कशासाठी असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

गणेशोत्सव जवळ आल्याने ढोल ताशा पथकांनी मोकळ्या जागा, नदी पात्र यासह इतर ठिकाणी सराव सुरू आहे. या काही मंडळांनी थेट सणस क्रीडांगणात मांडव टाकून सराव सुरू केला आहे. या क्रीडांगणातील सिंथेटिक ट्रॅक तयार खराब होऊ नये म्हणून प्रशासन काळजी घेत आहे.

अनेक खेळाडू, पालक, प्रशिक्षक हे मैदान खेळाडूंसाठी खुले करावे यासाठी अखेर आंदोलन करावे लागले होते. अशी स्थिती असताना याच क्रीडांगणात ढोलताशा पथकांनी विनापरवानगी थेट मांडव टाकून तेथे सराव सुरू केला आहे. एका पथकाने तर कबड्डीच्या मैदानावर मांडव टाकला आहे. पण त्यावर प्रशासनाने कोणतीही हरकत घेतलेली नाही.

राजकीय पक्षाकडून तोडफोड

सणस मैदानात ढोल ताशा पथकांना सराव करू द्यावा यासाठी राजकीय पक्षाचे पदाधिकारी प्रशासनावर दबाव आणत आहेत. परवानगी न दिल्यास वरिष्ठ नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना फोन करायला लावत आहेत. सणस मैदानावर सराव करण्यास नकार दिल्यानंतर काही राजकीय कार्यकर्त्यांनी दगडाने कुलूप तोडून घात घुसण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची अरेरावीही समोर आली आहे.

‘‘सणस क्रीडांगण येथे ढोलताशा पथकांचा सराव सुरू असल्यासंदर्भात क्रीडा विभागाकडून माहिती मागवून पुढील कारवाई केली जाईल.’’

- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त

‘‘गिरीश बापट पालकमंत्री असताना त्यांनी ढोलताशा पथक व नागरिकांच्या समन्वयातून कोणालाही त्रास होणार नाही व सराव देखील करता येईल अशी नियमावली तयार केली होती. पण तिचे पालन आता कोणीही करत नाही. असे असेल तर आम्हाला महापालिका भवनातील हिरवळीवर सरावासाठी परवानगी द्यावी अशी मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.’’

- संजय बालगुडे, गणेशोत्सव कार्यकर्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

Monday Morning Breakfast Recipe: ना लसूण, ना कांदा घरच्या घरी झटपट बनवा व्हेगन कबाब, सोपी आहे रेसिपी

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

SCROLL FOR NEXT