पुणे

सद्‍गुरू लेख

CD

इनर इंजिनिअरिंग... लोगो
सद्‍गुरू, ईशा फाऊंडेशन

जीवनाचा ‘खेळकर’ उत्सव

सद्‍गुरू : भारत हा असा देश आहे, जिथे वर्षातील प्रत्येक दिवसासाठी एक, असे एकूण ३६५ सण होते; म्हणजे संपूर्ण संस्कृतीच उत्सवाच्या अवस्थेत होती. जर आज नांगरणीचा दिवस आहे, तर तो एक प्रकारचा उत्सव आहे. उद्या पेरणीचा दिवस आहे, तर तो आणखी एक प्रकारचा उत्सव आहे. कापणी, अर्थातच, आज देखील उत्सव आहे. अशी उत्सवप्रिय संस्कृती आता हळूहळू नैराश्याच्या अवस्थेकडे गेली आहे. भारताच्या ग्रामीण भागातील मोठ्या लोकसंख्येने ही उत्सवाची भावना जवळजवळ पूर्णपणे गमावली आहे. हे मुख्यतः यामुळे, की अनेक पिढ्यांपासून भोगावी लागलेली तीव्र दारिद्र्याची परिस्थिती.
खेळ हा मानवामध्ये पुन्हा उत्सवाची ही भावना जागृत करण्याचा आणि त्याला स्वतःच्या मर्यादांपलीकडे कार्य करायला प्रवृत्त करण्याचा एक अतिशय सोपा मार्ग आहे. खेळ स्वाभाविकपणे मानवाला जीवनाच्या एका उत्साहपूर्ण अवस्थेत कार्य करायला प्रेरित करतो.
इंग्रजीतील ‘Are you game?’ या वाक्याचा साधा अर्थ हा आहे - ‘तुम्ही जीवनासाठी तयार आहात का?’ त्यामुळे, खेळ खेळणे किंवा खेळात सहभागी होणे, हे निरोगी जीवन घडवण्यासाठीचे महत्त्वपूर्ण घटक आहे. शारीरिक, मानसिक आणि अगदी आध्यात्मिक प्रक्रियेसाठीदेखील, एखाद्या व्यक्तीला खेळ कसा खेळायचा हे माहीत असणे महत्त्वाचे आहे. खेळामध्ये सहभागी होण्याबाबतची सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही तो अर्धवट मनाने खेळू शकत नाही. तुम्ही तुमचे काम अर्धवट मनाने करू शकता, अगदी तुमचे वैवाहिक जीवनही अर्धवट मनाने जगू शकता; पण तुम्ही एखादा खेळ अर्धवट मनाने खेळू शकत नाही. तुम्ही स्वतःला पूर्णपणे सहभागी केल्याशिवाय खेळ होतच नाही.
तुम्ही जे काही करत आहात, त्यामध्ये पूर्णपणे सहभागी होण्याची ही विलक्षण क्षमता - त्यासाठी लागणारी एकाग्रता - आणि त्या क्षणी जे साध्य करायचे आहे, त्याकरिता स्वतःच्या मर्यादांपलीकडे जाण्याची मानवी क्षमता, हे यशस्वी जीवनाचे अत्यंत आवश्यक घटक आहेत.
खेळ खेळणे किंवा समाजामध्ये खेळाची संस्कृती निर्माण करणे, हे समुदायभावना विकसित करण्यासाठी तुम्ही देऊ शकणाऱ्या लाखो उपदेशांपेक्षाही अधिक प्रभावी ठरते, कारण खेळ लोकांना एकत्र येण्यासाठी आणि एका समान दिशेने पुढे जाण्यासाठी स्वाभाविकपणे प्रेरणा देतो. जेव्हा तुम्ही एखाद्या संघासोबत खेळता, तेव्हा तुमचा स्वतःचा संघ असो किंवा प्रतिस्पर्धी संघ, जोपर्यंत तुम्ही स्वतःला एका विशिष्ट सर्वसमावेशकतेच्या अवस्थेत आणत नाही, तोपर्यंत तुम्ही तो खेळ चांगल्या प्रकारे खेळू शकत नाही. ही सर्वसमावेशकतेची भावना - म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दलच्या तुमच्या आवडी-निवडींच्या पलीकडे जाऊन त्या सर्वांना आपल्या संघाचा भाग म्हणून स्वीकारणे - आणि संपूर्ण समूहाने एका समान ध्येयासाठी एकत्रित प्रयत्न करणे, हे निश्चितपणे समुदायनिर्मितीसाठी आवश्यक असलेली मूलभूत तत्त्वे घडवतात.
सामाजिक परिवर्तन, आर्थिक पुनरुज्जीवन आणि मानवाचा आध्यात्मिक विकास या सर्व गोष्टी समाजामध्ये अत्यंत सहजपणे रुजवता येऊ शकतात, जर खेळाला याकरिता प्रवेशद्वार म्हणून वापरले गेले तर. यामागील उद्देश केवळ स्पर्धात्मक खेळ हा नाही; तर प्रत्येक मानव जीवनाच्या खेळासाठी सदैव तयार राहील, त्याच्यामध्ये खेळ भावना जागृत होईल, हा हेतू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Food Label Dates: गोंधळ संपला! 'Best Before' संपलं म्हणजे अन्न खराब झालं का? FSSAI ने सांगितला पॅकेटवरील तारखांचा खरा अर्थ

Tukaram Mundhe: ५१व्या वर्षीही हेल्दी अन् फिट राहण्यासाठी तुकाराम मुंढे फॉलो करतात 'हे' तीन नियम

Nanded Tragedy : अनुकंपा नियुक्तीची स्वप्ने अर्ध्यावरच खंडित; मरखेलच्या मंदार बोधकुले यांचे हृदयविकाराने अकाली निधन

Chandipura Virus: मुंबईत चांदीपुरा विषाणूच्या संसर्गाची भीती, आरोग्य विभाग अ‍ॅक्शन मोडवर; पालिकेच्या रुग्णालयात विशेष कक्ष

ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांनो लक्ष द्या! Meesho वरून खरेदी करता? तर आधी 'ही' बातमी नक्की वाचा; हायकोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT