पुणे

क्रीडा कार्यालय राष्ट्रीय क्रीडा दिन

CD

खेळामुळे शासन सेवेत नियुक्‍तीची संधी

जिल्‍हाधिकारी; क्रीडाधिकारी कार्यालयासह विविध संस्‍थांतर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन

सातारा, ता. १ : खेळामुळे शारीरिक व मानसिक सुदृढता प्राप्त होत असल्याने जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धांत हिरिरीने सहभाग नोंदवावा. खेळातील प्रावीण्यामुळे शासन सेवेत थेट नियुक्तीचा लाभ मिळत असल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी नमूद केले.

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व विविध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला. यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते गुणवंत खेळाडूंचा, तालुकास्तर स्पर्धा आयोजकांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडाधिकारी पल्लवी धात्रक होत्या.
यावेळी वायसी कॉलेजचे प्राचार्य सुरेश साळुंखे, उपप्राचार्य नंदिनी साळुंखे, कोल्हापूर विभागीय शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर. वाय. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. धात्रक यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रग्बी, रोलबॉल, हॅण्डबॉल, फुटबॉल, हॉकी या खेळाच्या विविध ठिकाणी स्पर्धा, लोणंद येथे क्रीडा साहित्याचे प्रदर्शन आदी उपक्रमांचे आयोजन केले. यावेळी आयोजिलेल्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद लाभल्याचे धात्रक यांनी नमूद केले. प्रदीप कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

PNE26W46232
सातारा : संतोष पाटील यांचे स्वागत करताना पल्लवी धात्रक. त्यावेळी प्राचार्य सुरेश साळुंखे आदी.
---------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet Decisions : मंत्रिमंडळ बैठकीवर तुकाराम मुंढेंचा प्रभाव चार महत्त्वाचे निर्णय; एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती

नाद खुळा...! वैभव सूर्यवंशीचा झंझावात अविश्वसनीय Catch ने रोखला, RCB च्या कर्णधाराचा Video तुफान व्हायरल झाला

Trump-Afghanistan: तालिबानची ट्रम्प यांना 1,000,000,000,000 डॉलरची ऑफर! बदल्यात ठेवली 'ही' मोठी अट

Kanakagiri Sambhaji Maharaj Memorial : कणकगिरीत थोरले संभाजी महाराजांच्या समाधीवर उभारली ४०० किलोची मेघडंबरी; पुण्यातील शिवप्रेमींचा ‘गनिमी काव्या’ने यशस्वी उपक्रम

Marathi News Live Updates : दिल्लीसह देशातील विद्यार्थी आंदोलनांशी संबंधित सर्व एफआयआर रद्द- सुप्रीम कोर्टाचे निर्देश

SCROLL FOR NEXT