SPPU - ‘जी २०’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव स्टेडियममध्ये शनिवारपासून (ता.१७) ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र’ विषयावर प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन येत्या गुरुवारपर्यंत (ता.२२) असणार आहे, अशी माहिती जी २० परिषद संयोजन समितीचे समन्वयक राजेश पांडे यांनी दिली.
तीन ते नऊ वर्षे वयोगटातील मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत होण्यासाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र शिक्षण पद्धती आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन शैक्षणिक साधनांचा प्रदर्शनात समावेश असणार आहे.
विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांचे कुतूहल जागृत करणारी साधने प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. या साधनांमुळे विद्यार्थ्यांना हसत खेळत आनंददायी कृतियुक्त शिक्षण देणे शक्य होईल.
पुण्यातील सर्व शैक्षणिक संस्थांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीत प्रदर्शनाला अधिकाधिक पुणेकरांनी भेट द्यावी असे आवाहन पाटील यांनी केले होते. त्याला शिक्षण संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
तसेच पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या शाळांतील सुमारे दीड लाख विद्यार्थी आणि शिक्षक प्रदर्शनाला भेट देणार आहेत. पीएमपीएमएलने त्यासाठी विनामूल्य वाहन व्यवस्था केली आहे,’’ असे पांडे यांनी सांगितले.
प्रदर्शनाचे वैशिष्ट्य :
- शंभरहून अधिक शिक्षण संस्था आणि उत्पादकांची दालने असणार.
- वेळ : सकाळी दहा ते सायंकाळी सहा.
- प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार.
- स्थळ : खाशाबा जाधव स्टेडियम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.