Online Exam 
पुणे

पुणे विद्यापीठाची होणार सराव परीक्षा; आजपासून वेळापत्रक जाहीर 

सकाळवृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पहिल्या सत्राच्या ऑनलाईन परीक्षा १० एप्रिलपासून सुरू होणार असून त्यापूर्वी परीक्षेच्या साॅफ्टवेअरची महिती व्हावी  यासाठी ५ ते ९ एप्रिल या कालावधीत सराव परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे. पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्र परीक्षेला पाच महिने कोरोना व प्रशासकीय दिरंगाईमुळे उशीर झाला आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरची परीक्षा एप्रिल महिन्यात होत आहे. ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्न (मल्टिपल च्वाईस क्वेश्चन-एमसीक्यू) पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने होणार असून, गैरप्रकारावर नियंत्रण आणण्यासाठी प्राॅक्टर्ड मेथडचा वापर केला जाणार आहे. 

विद्यार्थ्यांना परीक्षा कशी होणार, त्यात प्रश्न काय पद्धतीचे असणार, पेपर सबमिट कसा करावा, तक्रार असल्यास संपर्क कसा साधावा याची माहिती व्हावी, यासाठी सामान्य ज्ञानावर  आधारित सराव परीक्षा उद्यापासून ५ ते ९ एप्रिल दरम्यान होणार आहे. 
या सराव परीक्षेची माहिती विद्यार्थ्यांना ई-मेल व मोबाइलद्वारे कळविण्यात येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचा नोंदणीकृत ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांक कार्यान्वित करणे आवश्‍यक आहे. तसेच परीक्षेसाठी www.sppuexam.in या संकेतस्थळाचा वापर करावा, असेही विद्यापीठाने सूचित केले आहे.

"सराव परीक्षेसाठी अभ्यासक्रम निहाय वेळापत्रक जाहीर केले आहे. तसेच तक्रार निवारणासाठी हेल्पलाईन व चाटबाॅक्स उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांचा लाॅगईन आयडी व पासवर्ड इमेल व मेसेज केला जाणार आहे."
- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: पुणे जिल्ह्यात दाेन दिवसांपासून अवकाळीने शेतीचे नुकसान: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अँक्शन मोडवर, तातडीने पंचनाम्याचे निर्देश!

Dhurandhar 2 ने पहिल्याच दिवशी कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला, बॉलिवूडच्या ओपनर सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडले

Alphonso Mango Price : हापूसचा 'रुबाब' वाढला! 5 हजारांपासून 12 हजारांपर्यंत एक पेटी; सोन्याच्या दरात विकला जातोय कोकणचा राजा

Accident News : देवदर्शन ठरले अखेरचे ! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांंचा दुर्दैवी मृत्यू

Jalna News: परतूर तालुक्यात कामगार योजनेत मनमानी; वर्ष उलटले तरीही क्लेम रखडलेले

SCROLL FOR NEXT