पुणे

पुणे विद्यापीठात 'सीसीटीव्ही'ची नजर 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महाराष्ट्र सुरक्षा दलाकडून (एमएसएफ) आणखी 48 सुरक्षारक्षक घेण्यात आले आहेत. विद्यापीठातील सर्व रस्त्यांवर लवकरच "सीसीटीव्ही'ची नजर राहणार आहे, त्यासाठी "सेंट्रल कमांड कंट्रोल रूम' तयार केली जाणार आहे. 

देशात घडत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांकडून शहरातील सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. मनुष्यांची वर्दळ कमी असलेल्या ठिकाणांवर खास करून लक्ष ठेवले जात आहे. पुणे विद्यापीठ 400 एकरपेक्षा जास्त जागेवर विस्तारलेले आहे. विद्यापीठात सुरक्षा व्यवस्था अपुरी असल्याने आवारातील चंदनाच्या झाडांसह विविध इतर वस्तूंची चोरी होण्याचे प्रकार घडले आहेत. 

विद्यापीठातील अंतर्गत रस्त्यांवर "सीसीटीव्ही' नाहीत. काही विभागांची त्यांच्या आवारापुरते "सीसीटीव्ही' बसविले आहेत. त्यामुळे आता विद्यापीठातील रस्त्यांना सुरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या विविध विभागांमध्ये सुमारे 300 "सीसीटीव्ही' आहेत. नुकतेच विद्यापीठातील रस्त्यांवर 300 नवे पथदिवे लावण्यात आले. आता या रस्त्यांवर सुमारे 500 "सीसीटीव्ही' बसविले जाणार आहेत. तसेच, या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी "सेंट्रल कमांड कंट्रोल' रूमही तयार केली जाणार आहे. 

गस्तीसाठी बंदुकधारी सुरक्षारक्षक 
विद्यापीठात सुमारे 12 किलोमीटर लांबीचे अंतर्गत रस्ते आहेत. दिवसासह रात्री गस्त घालण्यासाठी तीन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकात चारचाकी आणि एक बंदूकधारी, दोन महिलांसह एकूण पाच सुरक्षारक्षक आहेत. ही गस्त तीन पाळ्यांमध्ये सुरू झाली आहे. या गाडीमध्ये घोषणा करण्यासाठी स्पीकरच्या सुविधेसह चार कॅमेरेही लावले जाणार आहेत. 

विद्यापीठाची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी नव्याने 48 सुरक्षारक्षक घेतले आहेत. त्यामध्ये चार बंदूकधारी सुरक्षारक्षक आहेत. "सीसीटीव्ही'ची यंत्रणा उभारण्यासाठी सुमारे 3 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. 
- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT