पुणे

पुणे जिल्हा कनिष्ठ गट मैदानी स्पर्धा

CD

सावित्रीबाई फुले विद्यापीठ ः खाशाबा जाधव स्पोर्ट्‌स ॲथलेटिक्स मैदानावर गुरुवारपासून सुरू झालेल्या कनिष्ठ गट मैदानी स्पर्धेत शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीतील चौदा वर्षाखालील मुलींच्या गटातील एक क्षण ही शर्यत स्पृहा पानगरेने (बीब क्रमांक १८८) जिंकली.
------------

कृष्णा श्रीमाले व स्पृहा पानगरेला वेगवान धावपटूचा मान
पुणे जिल्हा कनिष्ठ गट मैदानी स्पर्धा

पुणे, ता. ६ ः द. पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने आयोजित माधुरी शिरोळे स्मृती कनिष्ठ गटाच्या मैदानी स्पर्धेत चौदा वर्षांखालील मुले व मुलींच्या गटात अनुक्रमे कृष्णा श्रीमाले व स्पृहा पानगरेने शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रथम स्थान मिळविताना वेगवान धावपटूचा मान मिळविला.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या खाशाबा जाधव स्पोर्ट्‌स ॲथलेटिक्स मैदानावर गुरुवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत मुलांच्या गटात कृष्णा श्रीमालेने हे अंतर १३.७३ सेकंदांत पूर्ण करून प्रथम स्थान मिळविले. सारस कांबळेने (१३.७४ सेकंद) दुसरा, तर अरिफ शेखने (१४.०८ सेकंद) तिसरा क्रमांक मिळविला. मुलींच्या गटात स्पृहा पानगरेने (१४.३४ सेकंद) प्रथम स्थान मिळविले. तनिषा भंडारीने (१४.४७ सेकंद) द्वितीय, तर दूर्वा वाडीकरने (१४.५० सेकंद) तृतीय स्थान मिळविले. अन्य वयोगटातील शर्यतीत मोहद दानिश, वैष्णवी सरडे, संजना चैनानी, वेद चव्हाण, वरदराज जगताप, शौर्य साकोरेने प्रथम स्थान मिळविले.
या स्पर्धेचे उद्‍घाटन संघटनेचे सहसचिव विजय बेंगळे यांच्या हस्ते झाले. या वेळी जिजामाता पुरस्कार विजेत्या गुरुबन्स कौर, चंद्रकांत पाटील, रोहित घाग, शेखर कुदळे, विजय दुबे, पौर्णिमा जाधव, किरण उत्तेकर, अभय पोद्दार हे उपस्थित होते.
निकाल असे ः
२० वर्षांखालील ः पाच हजार मीटर धावणे ः मुले ः (१६ मिनिट ०५.२२ सेकंद) मोहद दानिश. मुली ः (२१ मिनिट ०४.६१ सेकंद) वैष्णवी सरडे, प्रगती ठाकूर.
अठरा वर्षांखालील मुली ः गोळा फेक (१२.९२ मीटर) संजना चैनानी, अमृता जाधव, ज्ञानेश्वरी गीते.
अठरा वर्षांखालील मुले ः ११० मीटर अडथळा शर्यत (१६.५३ सेकंद) वेद चव्हाण, अखिलेश लोलगे, साहिल घुलेकर.
सोळा वर्षांखालील मुले ः गोळाफेक (१५.७२ मीटर) वरदराज जगताप, सक्षम यादव, शिवांश सूर्यवंशी. उंच उडी ः मुले ः (१.६६ मीटर) शौर्य साकोरे, अंश पाटणकर, तन्मय वाघ.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Gavit: सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला अडीच तास ताटकळत ठेवलं! दिलीप गावित यांचा राज ठाकरेंवर संताप

Karamad-Ladsawangi Accident : करमाड–लाडसावंगी रस्त्यावरील खड्ड्यांचा तिसरा बळी; भरधाव टेम्पोच्या धडकेत ७९ वर्षीय वृद्धेचा मृत्यू, चालक फरार

Marathi News Live Updates: मोहन भागवत यांनी सातत्याने 'जनरेशन झेड'शी संवाद साधला आहे, याचा मला आनंद - राहुल नार्वेकर

Godavari Fisherman Electrocuted: गोदावरीच्या पुरात मासेमारी करताना मच्छीमाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; नदीत उतरलेल्या वीजप्रवाहावरून ग्रामस्थांचा संताप

Rajgad Khopadewadi funeral crisis: राजगड परिसरातील खोपडेवाडीत ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार; स्मशानभूमीअभावी ग्रामस्थांचा संताप उफाळला

SCROLL FOR NEXT