पुणे

वाल्ह्यात सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम

CD

गणेश मंडळाचे नाव - श्री संत सावतामाळी तरुण मंडळ, सावतामाळी चौक, वाल्हे, ता. पुरंदर
स्थापना वर्ष - १९५५
अध्यक्ष - संकेत दुर्गाडे, उपाध्यक्ष - प्रणव भुजबळ

सात दशकांहून अधिक काळापासून मंडळ धार्मिक परंपरेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करीत आहे. काळानुरूप मंडळाच्या कार्यपद्धतीत बदल झाला असून उत्सवाचे स्वरूपही अधिक व्यापक झाले आहे. गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर दरवर्षी नावीन्यपूर्ण व आकर्षक देखावे तयार करून त्यातून सामाजिक, धार्मिक तसेच प्रबोधनात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो. हे देखावे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी होत असते.
मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांसह मुलांसाठी तसेच महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक, बौद्धिक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा उत्सव ठरत आहे. मंडळाच्या माध्यमातून गरजू व गरीब कुटुंबांना आर्थिक मदत तसेच आवश्यकतेनुसार साहित्यरूपी मदत केली जाते. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आरोग्य तपासणी, रक्तदान व विविध जनजागृतीपर शिबिरांसह सामाजिक उपक्रम राबविले जातात. आपत्तीच्या काळात नागरिकांना मदतीचा हात देतानाच सामाजिक कार्यातही मंडळाचा सातत्याने सहभाग असतो. अबालवृद्धांसह तरुणांच्या सहभागातून सामाजिक एकोपा, सेवाभाव आणि सामाजिक जाणीव वाढविण्याचे काम मंडळ करीत आहे. या वर्षी केदारनाथ मंदिराचा देखावा मंडळ साकारत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मुंबईत आंदोलनाला परवानगी नाकारली, मनोज जरांगे आक्रमक; काय म्हणाले?

VAIBHAV SOORYAVANSHI : आज मैदानात उतरताच वैभव सूर्यवंशी रचणार इतिहास! अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकरांचा विक्रम मोडणार

जन्मठेप भोगणाऱ्या माजी खासदाराच्या फोनमध्ये १५० पेक्षा जास्त पॉर्न क्लिप्स, जेलमधून गर्लफ्रेंडला करायचा कॉल

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाकारली

Arun Dongale Gokul Milk Election : गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंची मोठी घोषणा; ‘ही माझी शेवटची गोकुळची निवडणूक’

SCROLL FOR NEXT