sri sri ravi shankar sakal
पुणे

Pune News : श्री श्री रविशंकर सोमवारपासून पुणे दौऱ्यावर

आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर येत्या सोमवारपासून (ता. ५) पुणे दौऱ्यावर येत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर येत्या सोमवारपासून (ता. ५) पुणे दौऱ्यावर येत आहेत. सोमवार ते गुरुवार (ता. ८) या चार दिवसांच्या दौऱ्यात ते दहा हजार शेतकरी, सरपंच, औद्योगिक प्रतिनिधी तसेच ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधतील.

सुनील पोतदार यांनी सोमवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याप्रसंगी धीरज अगरवाल, स्वामी परवानंद, राजे शास्त्री, कुमकुम नरेन उपस्थित होते. श्री श्री रविशंकर यांच्या भेटीदरम्यान आळंदीजवळील मरकळ येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या त्रिवेणी आश्रमात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या चार दिवसांच्या सोहळ्याची सुरुवात सोमवारी सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत होणाऱ्या रुद्रपूजेने होईल. त्यानंतर दररोज सकाळी श्री श्री रविशंकर हे विविध क्षेत्रांतील मान्यवरांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत चारही दिवस सायंकाळी सत्संग होणार आहे.

तसेच, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैविध्यतेचे दर्शन घडवणारे पोवाडा, शिवराज्याभिषेक सोहळा, नाशिक ढोल, आदिवासी, कोळी नृत्य आणि पुण्याची सांस्कृतिक संपन्नता दर्शविणारे गणेशोत्सव सोहळा, दिंडी, नांदी, गोंधळ असे विविध कार्यक्रम होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

Investment: पोस्ट ऑफिसच्या 15-5-5 फॉर्म्युल्याने बना करोडपती! काय आहे ही गुंतवणूक योजना?

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा ईडीकडे सोपवावा; शिक्षक परिषदेची मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

Lucky Zodiac Signs: “वयाच्या ३० नंतर अचानक बदलतं ‘या’ ५ राशींच्या लोकांचं नशीब; पैसा, करिअर आणि सुख-समृद्धीमध्ये होते मोठी वाढ”

माधुरी दीक्षितने 'कोण होणार करोडपती' होस्ट करायला होकार का दिला? स्वतः सांगितलं खरं कारण; म्हणते- मराठीत...

SCROLL FOR NEXT