कऱ्हाडला श्रीनिवास कुलकर्णींचा सन्मान
राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल पालिकेतर्फे गौरव
कऱ्हाड, ता. १२ ः राज्य शासनातर्फे साहित्य क्षेत्रातील मानाचा विं. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार येथील ज्येष्ठ साहित्यिक ‘डोह’कार श्रीनिवास कुलकर्णी यांना मिळाल्याबद्दल येथील पालिकेतर्फे त्यांना मानपत्र प्रदान करून त्यांचा आज सत्कार करण्यात आला.
श्री. कुलकर्णी यांना नुकताच राज्य शासनाचा विं. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला आहे. त्यानिमित्त येथील पालिकेने सर्वसाधारण सभेत कुलकर्णी यांच्या अभिनंदन करून मानपत्र देण्याचा ठरावही केला होता. नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष प्रतापराव साळुंखे, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, बांधकाम सभापती अख्तर आंबेकरी, पाणीपुरवठा सभापती अल्ताफ शिकलगार, नगरसेवक सुहास पवार, नरेंद्र लिबे, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, सुरेश पाटील, सुधीर एकांडे, राहुल खराडे, जयंत बेडेकर यांनी श्री. कुलकर्णी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन त्यांना मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.
सन्मानाबद्दल बोलताना उदयन श्रीनिवास कुलकर्णी म्हणाले, ‘‘वडील नोकरीनिमित्त कऱ्हाडला आले. १९६५ ला त्यांची ‘डोह’ कादंबरी प्रकाशित झाली. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी तिचे वाचन केल्यावर त्यांना बोलावून घेतले. पुढे हा स्नेह वाढला. श्री. कुलकर्णी यांच्या कादंबरीस पहिला राज्य पुरस्कार मिळाला. त्यावेळीही तत्कालीन नगराध्यक्ष पी. डी. पाटील यांनी त्यांचा पालिकेतर्फे सत्कार केला. आज पुन्हा पालिकेकडून सत्कार होत आहे. यशवंतराव चव्हाण यांच्यामुळेच वडिलांना घर मिळाले, कऱ्हाडशी ऋण कायम राहिला.
नगराध्यक्ष यादव म्हणाले, ‘‘शहराच्या साहित्य क्षेत्रातील श्रीनिवास कुलकर्णी हे अमूल्य ठेवा आहेत. त्यांची साहित्य क्षेत्रातील कामगिरी शहरासाठी गौरवास्पद आहे. त्यांनी उत्तम साहित्यकृती निर्माण केल्या. शहरातील दोन साहित्य संमेलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान भूषणावह असून, शासनानेही त्यांचा सन्मान केला. पालिकेनेही शहराच्या या सुपुत्रास मानपत्र देऊन गौरविले आहे.’’
W18709
कऱ्हाड ः श्रीनिवास कुलकर्णी यांना मानपत्र देताना राजेंद्रसिंह यादव, जयंत पाटील. त्यावेळी प्रतापराव साळुंखे, प्रशांत व्हटकर, अख्तर आंबेकरी, सौरभ पाटील आदी.
--------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.