आळेफाटा, ता. ९ ः राजुरी (ता. जुन्नर) येथील महारिया चॅरीटेबल ट्रस्टच्या सह्याद्री व्हॅली आभियांत्रिकी महाविद्यालयाचे ‘सृजन’ हे वार्षिक स्नेहसंमेलन २० ते २८ फेब्रुवारी यादरम्यान उत्साहपूर्ण वातावरणात झाले. या प्रसंगी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष व्ही. आर. दिवाकरन, उपाध्यक्ष किशोरभाई पटेल, सचिव गणपत कोरडे, संस्थेचे खजिनदार सचिन चव्हाण, संचालक नागेश आस्पात, डॉ. के. आर. भानुशाली, प्राचार्य डॉ. संजय झोपे, उपप्राचार्य बालारामडू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम, म्युझिकल चेअर आदी क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्याचबरोबर पोस्टर प्रेझेंटेशन, डिजिटल पोस्टर, मेहंदी, रंगोली व विविध डेज साजरे करण्यात आले.
या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये एकपात्री अभिनय, समूह गीत गायन, नृत्य, कला, लावणी, नाटक इत्यादी कलाप्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. या कार्यक्रमांनी स्नेहसंमेलनाची रंगत वाढवली. प्रा. सतीश नेहे, प्रा. रांधवन भागवत यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. ग्रंथपाल उद्धव भारती, प्रा. सपना कदम यांनी परिक्षण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कविता खटाळ व प्रा. कविता खेमनर यांनी केले. तर प्रा. सतीश नेहे यांनी आभार मांडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.