Ayush Prasad sakal
पुणे

Pune Schools : दहावी बारावीचा निकाल घसरलेल्या शाळांना नोटिसा; झेडपी सीईओ आयुष प्रसाद यांचा आदेश

दहावी, बारावीच्या निकालाची टक्केवारी सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने वार्षिक परीक्षेसाठी ७५ दिवसांचा निकालवृद्धी कार्यक्रम राबविण्यात आला होता.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील दहावी, बारावीच्या निकालाची टक्केवारी सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने वार्षिक परीक्षेसाठी ७५ दिवसांचा निकालवृद्धी कार्यक्रम राबविण्यात आला. मात्र हा कार्यक्रम राबवूनही २३ शाळांचा निकाल हा पुन्हा एकदा ८० टक्क्यांपेक्षा कमीच लागला आहे.

निकाल कमी लागलेल्या या शाळांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी नोटिसा पाठविण्याचा आदेश मंगळवारी (ता.२०) माध्यमिक शिक्षण विभागाला दिला आहे. यानुसार आपले अनुदान बंद का करू नये, अशी विचारणा या नोटिशीद्वारे या शाळांना केली जाणार असल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या वतीने दहावी, बारावीच्या निकालात सुधारणा करण्यासाठी राबविण्यात आलेल्या निकालवृद्धी कार्यक्रमाचा गुणवत्तेत कच्च्या असलेल्या ५२ शाळांना फायदा झाला आहे. या शाळांचा निकाल पूर्वी ८० टक्क्यांहून कमी लागत असे. त्यात आता मोठी सुधारणा होऊन, या शाळांचा निकाल हा ८० टक्क्यांहून अधिक लागला असल्याचे प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुणे जिल्ह्यातील ७९ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा या दहावी, बारावीच्या निकालाच्या टक्केवारीत कायम ८० टक्क्यांच्या आत राहत असत. यापैकी ४ शाळा बंद झाल्या आहेत. उर्वरित ७५ शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी निकालवृद्धी कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये निकाल कमी लागण्याची कारणे शोधून, त्यावर उपाय सुचविण्यात आले होते.

दरम्यान, यंदाही जिल्हा परिषद ही दहावी, बारावीचा निकाल सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. किमान चालू शैक्षणिक वर्षात तरी या शाळांनी सुधारणा करणे गरजेचे आहे. यासाठी या शाळांमधील शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drugs Crackdown: पुणे पोलिसांचा ड्रग्ज तस्करांना दणका! 162 गुन्हे, 283 आरोपी अटकेत; 11.28 कोटींचा मुद्देमाल जप्त

IND vs PAK : भारत-पाकिस्तान २ ऑगस्टला क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; हा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार?

ITR Date Extension 2026: आज ITR भरण्याची अंतिम मुदत! डेडलाइन वाढणार? 'या' करदात्यांना मात्र आधीच दिलासा

Monsoon Cough & Cold: पावसाळ्यातल्या सर्दी-खोकल्यापासून झटपट आराम हवाय? मग लगेच करा 'हे' घरगुती आयुर्वेदिक उपाय

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT