सकाळ कार्यालय, बुधवार पेठ - सकाळ अभ्यासमालेचा आधार घेतल्याने दहावीच्या परीक्षेत घवघवीत  यश मिळविलेले विद्यार्थी. (डावीकडून) अथर्व लोहार, प्रथमेश निकम, रिया बोडके, तनया टोळगे,  अथर्व नाईक, अद्वैत माळी.
सकाळ कार्यालय, बुधवार पेठ - सकाळ अभ्यासमालेचा आधार घेतल्याने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविलेले विद्यार्थी. (डावीकडून) अथर्व लोहार, प्रथमेश निकम, रिया बोडके, तनया टोळगे, अथर्व नाईक, अद्वैत माळी. 
पुणे

SSC Results : आमच्या यशात ‘सकाळ’चाही मोलाचा वाटा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमामुळे ‘सकाळ’ने पुढाकार घेत अभ्यासमाला सुरू केली. ठिकठिकाणी कार्यशाळा घेण्यात आल्या. त्याचा फायदा असंख्य विद्यार्थ्यांना झाला आणि चांगले गुण मिळाले, असे सांगत आमच्या यशात ‘सकाळ’चाही वाटा आहे, अशा भावना दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

अद्वैत माळी (९०.४ टक्के) - ‘सकाळ’ने आयोजित केलेले सेमिनार मला खूपच फायदेशीर ठरले. पेपर सोडविण्याच्या पद्धती त्यात समजल्याने मला परीक्षेत चांगले गुण मिळविता आले. 

प्रथमेश निकम (९० टक्के) - दहावीचा अभ्यासक्रम बदलल्याने पेपर कसा असेल, याची उत्सुकता तर होतीच, त्याहून अधिक चिंतापण होती. पण ‘सकाळ’मध्ये अभ्यासमाला सुरू झाली, कृतिपत्रिका येऊ लागली आणि आमचा ताण कमी होत गेला. दररोज पेपरमधील कृतिपत्रिका सोडविल्यामुळे मला अधिक गुण मिळू शकले.

रिया बोडके (९२.४० टक्के) - नवीन अभ्यासक्रम असल्याने शाळेत गोंधळच होता; परंतु अभ्यासमालेमुळे पेपरचे स्वरूप समजले. प्रश्‍नपत्रिकेतील बारकावे समजलेच; पण पेपर सोडवायचा याचाही अंदाज आला. 

तनया टोळगे (९१ टक्के) - अभ्यासक्रम बदलल्याने परीक्षेबाबत संदर्भासाठी काहीच नव्हते. सकाळ अभ्यासमाला आणि सेमिनार, कृतिपत्रिकांचा उपयोग झाला. शाळेमध्येही पेपरमधील अभ्यासमालेचे कात्रण काढून त्याची पुस्तिका तयार करण्यास सांगितली होती. त्याचा उत्तरपत्रिका सोडविण्याच्या सरावासाठी खूप फायदा झाला.

अथर्व लोहार (८६ टक्के) - दहावीचा पूर्ण अभ्यासक्रम बदलला होता. त्यामुळे पेपर कसा येणार याची कोणतीच कल्पना नव्हती. परंतु ‘सकाळ’मध्ये अभ्यासमाला सुरू झाली, सेमिनार सुरू झाले. त्याची खूप मदत झाली.

‘सकाळ’मधील अभ्यासमालेमुळे आम्हाला परीक्षेचा अभ्यास कसा करावा, हे समजले. त्यानुसार आम्ही नियोजनबद्ध अभ्यास केला. अभ्यासमालेमुळेच मला एवढे गुण मिळू शकले.
- अथर्व नाईक (९२.८० टक्के)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT