पुणे

#EducationIssue दहावीची कलचाचणी ‘ॲप’द्वारे

सकाळवृत्तसेवा

पुणे - दहावीच्या विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी आणि त्यांना करिअर मार्गदर्शन करण्यासाठी उपयुक्त ठरणारी कलचाचणी आता ‘मोबाईल ॲप’द्वारे होणार आहे. यापूर्वी संगणकाच्या साहाय्याने होणारी ही चाचणी यंदापासून ‘ॲप’द्वारे ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे गेल्या तीन वर्षांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी संगणकाच्या माध्यमातून घेण्यात येत होती. आता ही चाचणी ‘मोबाईल ॲप’द्वारे घेण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. ‘महाकरिअर मित्र’ ॲपद्वारे ही कलचाचणी घेतली जाणार आहे. तसेच यंदा अभिक्षमता (ॲप्टिट्यूड) चाचणीदेखील घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सरल आयडीच्या आधारे ही चाचणी होईल. यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार असून, त्याचे वेळापत्रकही शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. ‘मोबाईल ॲप’द्वारे चाचणी घेतली जात असल्यामुळे ‘रिअल टाइम डेटा’ मिळणार आहे. त्यामुळे कलचाचणीचा निकालही लवकर लावणे शक्‍य होणार आहे. येत्या एक-दीड महिन्यात कलचाचणीस सुरवात होण्याची शक्‍यता आहे. 

दहावी, बारावीचे वेळापत्रक जाहीर
 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा १ मार्च ते २२ मार्च २०१९ दरम्यान, तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्चदरम्यान होणार आहे. मंडळाने यापूर्वी जाहीर केलेले संभाव्य वेळापत्रक अंतिम केले आहे, ही माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्राची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयात छापील स्वरूपात अंतिम वेळापत्रक दिले जाईल, असे डॉ. भोसले यांनी सांगितले.

यंदापासून कलचाचणी ‘मोबाईल ॲप’द्वारे होणार आहे. कलचाचणी देण्यासाठी शाळांना स्वतंत्र लॉगिन आयडी दिला जाईल. पहिल्या टप्प्यात तज्ज्ञ शिक्षकांना येत्या बुधवारपासून (ता. २८) प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक तालुक्‍यातून दोन शिक्षकांची या प्रशिक्षणासाठी निवड केली आहे. 
- शकुंतला काळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने कलचाचणी घेता येणार आहे. शाळांमध्ये इंटरनेटचे नेटवर्क नसल्यास ‘ॲप’वरील ऑफलाइनचा पर्याय उपलब्ध असेल. ऑफलाइन चाचणी घेतल्यानंतर नेटवर्क उपलब्ध होईल, त्या वेळी ॲपवरील विद्यार्थ्यांनी दिलेल्या चाचणीची माहिती अपलोड होईल. 
- शीतल बापट, संस्थापक-संचालक, श्‍यामची आई फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT