st bus
st bus 
पुणे

कोकणातील एसटीमुळे मुळशीकरांची गैरसोय

सकाळ वृत्तसेवा

तालुक्‍यातील बसथांब्यांवर गाड्या थांबत नसल्यामुळे प्रवाशांची अडचण
माले (पुणे): ताम्हिणी घाट मार्गे कोकणात जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्यांमुळे मुळशीतील प्रवाशांची सोय होण्याऐवजी अडचणच होत आहे. बसथांब्यांवर एसटी थांबत नसल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ताम्हिणी घाट मार्गे सुमारे 18 वर्षांपूर्वी कोकणात जाण्याचा मार्ग सुरू झाला. या मार्गे माणगाव, तळा, विन्हेरे, दापोली, मंडणगड, कोलाड, दिवेआगार, श्रीवर्धन या भागात जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या सुरू झाल्या. त्यामुळे मुळशीकरांचीही सोय झाली. या मार्गावर एसटीची संख्या वाढल्यामुळे स्वारगेट आगारातून मुळशी धरण भागातील ताम्हिणी भागासाठी सुटणाऱ्या एसटीच्या फेऱ्या कमी झाल्या. मात्र, कोकणात जाणाऱ्या या लांब पल्ल्याच्या एसटी गाड्या मुळशीतील बसथांब्यांवर उभ्याच राहत नसल्यामुळे प्रवाशांची अडचण झाली. याबाबत प्रवाशांनी वेळोवेळी आवाज उठवला. मात्र, त्यात कोणताही सुधारणा झाली नाही. अगदी सुरवातीपासूनची ही परिस्थिती आता "शिवशाही' बसमुळे आणखी वाढली आहे.

मुळशी धरण भागातील माले ते आदरवाडीपर्यंत नागरिक विविध कामांसाठी माले, पौड, पुणे येथे नियमित येत असतात. तसेच, पळसे, ढोकळवाडी, वारक, चाचिवली, निवे, आदरवाडी येथील विद्यार्थी ताम्हिणी येथील श्री विंझाईदेवी माध्यमिक विद्यालयात जात असतात. परंतु, या मार्गावरून जाणाऱ्या कोकणात जाणाऱ्या व येणाऱ्या एसटी गाड्या बसथांब्यावर अनेक वेळा हात दाखवूनही थांबत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची व नागरिकांची मोठी गैरसोय होते. अनेकदा विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारावी लागते. तर, पौड किंवा माले येथे तासन्‌तास थांबूनही एसटी थांबत नसल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच, या मार्गावर शिवशाही गाड्या सुरू केल्यामुळे या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. तसेच, पौडपुढील कोंढावळे, कळमशेत, अकोले, शेरे, जामगाव, दिसली येथील प्रवाशांना थेट माले गावापर्यंतचे तिकीट दिले जाते.

तक्रार करायची तरी कोठे?
कोकणात जाणाऱ्या व येणाऱ्या या गाड्या अगदी रिकाम्या असल्यातरी थांबत नाहीत. पौड येथील बसस्थानकातही सकाळी, संध्याकाळी व रात्री गाड्या आणल्या जात नाहीत. त्यामुळे बसस्थानकात एसटीची वाट पाहणाऱ्यांची कुचंबणा होते. शुक्रवारी (ता. 21) दुपारी पावणेचार वाजता पौड बसस्थानकात आलेल्या "दापोली- शिर्डी' या एसटी बसच्या (क्र. एमएच 20 बीएल 3269) वाहकाने प्रवाशांना गाडीमध्ये बसू दिले नाही. त्यामुळे या प्रवाशांची गैरसोय झाली, अशी तक्रार अनंता शेंडे व इतर प्रवाशांनी केली. याबाबत तक्रार करण्यासाठी पौडच्या बसस्थानकात गेले, तर नियंत्रक तेथे उपस्थित नव्हे. तसेच, स्वारगेट आगाराचा दूरध्वनी कोणी उचलत नव्हते. त्यामुळे तक्रार करायची तरी कोणाकडे, असा सवाल या प्रवाशांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT