पुणे

एस.टी. चालकाने माळशेज घाटातील दरीत उडी घेत केली आत्महत्या

पराग जगताप

पुणे-नगर-ठाणे जिल्हाच्या हद्दीवर असलेल्या माळशेज घाटात बोगद्याजवळील महादेव मंदिरासमोरील दरीत एस.टी. चालकाने उडी मारून आत्महत्या केली आहे.

ओतूर - पुणे-नगर-ठाणे जिल्हाच्या हद्दीवर असलेल्या माळशेज घाटात बोगद्याजवळील महादेव मंदिरासमोरील दरीत एस.टी. चालकाने उडी मारून आत्महत्या केली आहे.

हि घटना बुधवारी दुपारी नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात घडली असून, यात गणपत मारुती इंदे, वय-४८, राहणार भंडारदरा, ता. अकोले, जिल्हा अहमनगर असे आत्महत्या करणाऱ्या बस चालकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की गणपत इंदे यांनी माळशेज घाटात एस.टी. थांबवली आणी खोल दरीत उडी मारून आत्महत्या केली. सदर एस.टी बस अहमदनगर डेपोची असून अकोले-कल्याण होती. सदर घटना समजताच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन टीमने घटनास्थळी धाव घेत तीन तासांच्या अथक परिश्रमाने २०० फुट दरीत उतरून मृतदेह बाहेर काढून टोकावडे पोलीस यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी टोकावडे पोलिस ठाण्याचे अधिकारी संतोष दराडे व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन टीम जुन्नरचे प्रशांत केदारी, माजी सैनिक रमेश खरमाळे, राजकुमार चव्हाण, आदित्य आचार्य, श्याम कबड्डी, लखन संकेत बोंबले, सुनील शिंदे, बाळू साबळे, पांडुरंग पगार, सुनील साबळे आदींनी मृतदेह दरीतून बाहेर काढण्यास मदत केली.

इंदे याचे कालच मंगळवारी वेतन झाले होते. आर्थिक ताणाताण आणि कमी पगार यामुळे आत्महत्या केल्याचे सांगीतले जात आहे. या घटनेचा पुढील तपास टोकावडे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष दराडे करत आहेत.

विलिनीकरनाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर होते, नूकतीच एसटी रस्त्यावर धावायला लागून काही दिवस झाले असताना पुन्हा एकदा ही धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT