पुणे

एस.टी. कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

CD

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्या
शशिकांत वाघचौरे ः प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन
अहिल्यानगर, ता. ५ ः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनससह विविध आर्थिक मागण्या अद्याप प्रलंबित असल्याने अहिल्यानगर विभागातील कर्मचारी आक्रमक झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे; अन्यथा शुक्रवार (ता. ६) पासून संपाच्या तयारीत आहेत, अशी माहिती कास्ट्राईब राज्य परिवहन संघटनेचे अहिल्यानगर विभागीय सचिव शशिकांत वाघचौरे यांनी दिली.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की एसटी महामंडळातील कर्मचारी अहोरात्र प्रवाशांची सेवा करत असतात. ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता ग्रामीण, तसेच शहरी भागातील प्रवाशांना सुरक्षित वाहतूक सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण काम ते करतात. मात्र, अशा कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा आणि विविध आर्थिक प्रश्नांचा निर्णय वेळेत होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना बोनस मिळणे, तसेच त्यांच्या आर्थिक मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा योग्य सन्मान करून त्यांच्या कुटुंबीयांनाही सण आनंदाने साजरा करता यावा, यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.
एसटी कर्मचारी हा महामंडळाचा कणा असून, त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. कर्मचाऱ्यांना संपाचा मार्ग स्वीकारण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासनाने आणि महामंडळ प्रशासनाने तातडीने चर्चा करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा वाघचौरे यांनी व्यक्त केली.
कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना न्याय मिळावा आणि एसटीची जीवनवाहिनी अखंडित सुरू रहावी, यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JDU: जेडीयूच्या आढावा बैठकीत मंत्री अशोक चौधरींवर गंभीर आरोप, पक्षाच्या नेत्यांनी दिली थेट लेखी तक्रार

US Midterm Elections: भारतीय वंशाच्या मतदारांचा ट्रम्प यांना धोबीपछाड? सर्वेक्षणातील आकडेवारी काय सांगतेय

Kumbhephal Accident: कुंभेफळ उड्डाणपुलावर काळाचा घाला! भरधाव चारचाकीच्या धडकेत १३ वर्षीय एकुलत्या एक गौरवचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Ambegaon News: आंबेगावकरांना दिलासा! पाणी-चारा टंचाई निवारणासाठी जून २०२७ पर्यंतचा आराखडा तयार; ६५ टँकरची तयारी

Latest Marathi News Live Update : भाजपच्या पदयात्रेमुळे नागपूर ठप्प; दिवाळी खरेदीसाठी निघालेल्या नागरिकांची कोंडी

SCROLL FOR NEXT