एसटी कामगार संघटनेतर्फे
वाईची कार्यकारिणी जाहीर
अध्यक्षपदी राहुल महांगडे, सुनील राेकडे सचिव
केळघर, ता. १६ : महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वाई आगाराची वार्षिक सर्वसाधारण सभा विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच वाई येथे झाली. सभेमध्ये वाई आगार कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी राहुल महांगडे व सचिवपदी सुनील रोकडे यांची निवड करण्यात आली.
या सभेला चरण गायकवाड, जितेंद्र खैरे, मंगेश कोरडे, सागर जमदाडे, दत्ता शिंदे, आशुतोष घाडगे, विलास दहिवाल, रमेश लोहार, दीपक शिंदे, विजय गार्डी, रघुनाथ पाचगणे, संतोष नावडकर, शिशीर भिलारे, शिवा रोडे, रूपेश घोडके, अमोल कांबळे, श्री. झगडे, जितेंद्र राजपुरे, राहुल साबळे, अक्षय कांबळे, संदीप निकम, श्री. घाडगे, गणेश जाधव, महिला प्रतिनिधी शामल टिळेकर उपस्थित होते.
यावेळी नूतन अध्यक्ष राहुल महांगडे, सचिव सुनील रोकडे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वाई आगारातील सर्व कामगारांना सोबत घेऊन कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करू अशी ग्वाही नूतन पदाधिकाऱ्यांनी दिली. नूतन कार्यकरिणीचे एसटी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे, सरचिटणीस हणमंतराव ताटे, केंद्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले.
फाेटाे :..........01433
वाई : एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना विजय चव्हाण, चरण गायकवाड, जितेंद्र खैरे आदी.
.........................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.