फेरीवाले sakal
पुणे

पथारी व्यावसायिकांना २० हजारांपर्यंत कर्ज

पीएम स्वनिधी कर्जाची फेड करणाऱ्यांसाठी योजना

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रामाणिकपणे पीएम स्वनिधी कर्जाची फेड करणाऱ्या पथारी व्यावसायिक व फेरीवाल्यांना आता १० हजारांऐवजी २० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

कोरोनामुळे अडचणीत आलेल्या पथारी व्यावसायिकांना पुन्हा उभे राहण्यासाठी केंद्र सरकारने सवलतीच्या दरात १० हजार रुपये कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. जून २०२० पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. योजनेतील कर्ज घेऊन नियमित फेडणाऱ्या व्यावसायिकांना या योजनेअंतर्गत व्याजात सवलत दिली होती.

पुणे शहरात जवळपास ४८ हजार पथारी व्यावसायिक आहेत. त्यापैकी २८ हजार ९८२ जण परवानाधारक आहेत. आतापर्यंत १२ हजार ९८ पथारी व्यावसायिकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला होता.

प्रत्यक्षात मात्र सात हजार ७४ जणांचे अर्ज मंजूर झाले तर अपुरी कागदपत्र व अन्य कारणांमुळे १० हजार ४८१ पथारी व्यावसायिकांचे अर्ज अपात्र केल्याने त्यांना कर्ज मिळाले नाही. याशिवाय, पाच ते सहा हजार पथारी व्यावसायिक असे आहेत, की ज्यांनी परवाना मिळण्यासाठी सर्व प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण करून महापालिकेकडे अर्ज केला आहे. शुल्कही भरले आहे. परंतु अद्याप त्यांना परवाना मिळाला नाही. त्यामुळे त्यांनाही मदतीचा लाभ घेता आला नाही.

दरम्यान, या योजनेतील कर्जाची रक्कम टप्प्याने वाढवावी. तसेच अर्ज अपात्र केलेल्या पथारी व्यावसायिकांना पात्र करावे, अशी मागणी जाणीव संघटनेने केंद्र सरकारकडे केली होती. केंद्राने ती मान्य करीत राज्य सरकारला आदेश दिले होते. त्यानुसार कर्जाची रक्कम १० हजारांवरून २० हजारांपर्यंत वाढविण्यास मान्यता दिली आहे.

"पीएम स्वनिधी योजनेतंर्गत मी कर्ज घेतले आहे. नियमितपणे आठ हप्ते फेडले. अद्याप दोन हप्ते बाकी आहेत. परंतू संपूर्ण कर्जफेड केलेल्यांनाच वाढीव कर्ज येाजनेचा लाभ मिळणार आहे. मी पात्र असूनही याचा लाभ मिळेल का नाही, याबाबत शंका आहे. असे अनेक पथारी व्यावसायिक आहे. राज्य सरकारने याचा विचार करावा."

- कैलाश बोरागे, चितळे कॉर्नर, कपडे विक्रेता

"यापूर्वी अर्ज केलेल्या परंतु अद्याप कर्जास पात्र न झालेल्या पथारी व्यावसायिकांचे अर्ज पात्र करावेत, तसेच वर्ष होण्याआधीच राज्य सरकारने ही योजना लागू केल्यामुळे अनेक पथारी व्यावसायिकांना अडचणी येणार आहेत. त्यामुळे योजनेची मुदत वाढवावी."

- संजय शंके, कार्याध्यक्ष, जाणीव हातगाडी, पथारी, फेरीवाले संघटना

अशी आहे स्थिती

  • ऑनलाइन अर्ज केलेल्यांची संख्या -१२ हजार ९८

  • मंजूर अर्जांची संख्या -७ हजार ७४

  • प्रत्यक्ष कर्ज मंजूर प्रकरणे- ५ हजार ७९०

  • अपात्र अर्जांची संख्या- १० हजार ४८१

  • पात्र होऊ शकणारे अर्ज- ४ हजार ३५८

  • कर्ज मंजूर रक्कम -७ कोटी ७ लाख

  • कर्ज वितरण रक्कम -५ कोटी ७५ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Galgotias University Student Endlife : गलगोटिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन, वसतिगृहात घेतला गळफास, धक्कादायक कारण समोर

Minor Girl Abuse in Yavatmal : यवतमाळ हादरलं! 55 वर्षाच्या नराधमाचा 9 वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार; राम मंदिर परिसरातील घटनेने संताप

Latest Marathi News Live Update : दिवाकर रावतेंच्या कार्यकाळात सुरू झालेल्या शिवशाही बसेस होणार बंद

T20 WC, IND vs ZIM: हारला तर बाहेर, जिंकला तरी टेन्शन कायम! भारताच्या सामन्यावर WI च्या निकालाची छाया, सेमीफायनलचं भवितव्य ठरणार

Solapur News: साेलापूरात केंद्र सरकार अन्‌ भाजपविरुद्ध काँग्रेसची निदर्शने; राहुल गांधींना धमकी, हनुमंत पवार यांच्यावरील हल्ल्याचा निषेध!

SCROLL FOR NEXT