Stamp 
पुणे

दस्तनोंदणी यापुढे तपासणीनंतरच

सकाळवृत्तसेवा

पुणे - जॉइंट व्हेंचर अथवा विकसन करारनाम्याची नोंदणी करताना यापुढे त्यांची मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासणी करून घेण्याचे बंधन दुय्यम निबंधकांना (सब रजिस्टार ) घालण्यात आले आहे. राज्य सरकारचा बुडणारा महसूल आणि भविष्यात नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी नोंदणी महानिरीक्षकांनी हा निर्णय घेतला आहे.

राज्यात दररोज हजारो दस्तांची नोंदणी होते. दस्त नोंदणी करताना भरावे लागणारे मुद्रांक शुल्क अनेकदा खरेदीदार अथवा विक्रीदाराकडून कमी भरले जाते. पुढे ऑडिटमध्ये अडचण निर्माण झाल्यानंतर संबंधितांकडून कमी भरलेले मुद्रांक शुल्क वसूल करण्याची प्रक्रिया नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सुरू केली जाते. त्यातून अनेक वाद निर्माण होतात. तसेच कमी भरल्या गेलेल्या मुद्रांक शुल्कावर विभागाकडून वार्षिक २४ टक्के दंड आकारला जातो. तो कमी करण्याचे अधिकार कायद्यात कोणालाही नाहीत. त्यामुळे नागरिकांचा अनेकदा विरोध होतो. परिणामी राज्य सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडतो. तसेच असे प्रकरणे अनिर्णित राहतात.

दिवसेंदिवस अशा प्रकरणांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जॉइंट व्हेंचर अथवा विकसन करारनामा करण्यासंदर्भातील दस्तांची नोंदणी करण्यापूर्वी दुय्यम निबंधकांनी तो दस्त मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासणी करून घेतला आहे की नाही, यांची खात्री केल्यानंतर त्यांची नोंदणी करावी, असे आदेश कवडे यांनी दिले आहेत. त्यासाठी शंभर रुपये शुल्क आकारून मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे असे दस्त तपासणी करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जागा मालक आणि विकसक यांच्यामध्ये जे करार होतात त्यामध्ये आर्थिक स्वरूपातील अथवा जागेच्या स्वरूपात मोबदला अशा विविध प्रकारे मोबदला देण्याचे ठरते. अशा दस्तांची नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्काची आकारणी करताना अनेक चुका होतात. त्यातून शासनाचा महसूल बुडतो. ते टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
- सी. बी. भुरकुंडे, नोंदणी उपमहानिरीक्षक

दहा वर्षांपूर्वी घेतलेल्या सदनिकेच्या दस्ताची प्रत काढण्यासाठी गेल्यानंतर मुद्रांक शुल्क कमी भरले म्हणून अडविण्यात आले. ते भरल्याशिवाय प्रत देणार नाही, असे सांगण्यात आले. वास्तविक योग्य मुद्रांक शुल्क आकारण्याची आणि ती भरून घेण्याची जबाबदारी सब रजिस्ट्रारची असते. त्यांनी ती केली नाही, त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला.
- रमेश कुलकर्णी, कोथरूड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT