पुणे

सहा हजार घरे बांधण्यास स्थायी समितीची मान्यता 

सकाळवृत्तसेवा

पुणे : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिकेने हडपसर, खराडी, वडगाव खुर्द या तीन ठिकाणी 6 हजार 264 सदनिका बांधण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. 

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील शहरांत पंतप्रधान आवास योजना राबविली जात आहे. पुण्यातही या योजनेंतर्गत झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणे, कर्ज-संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे, खासगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान देणे आदी पद्धतीने सदनिका बांधता येणार आहेत. 

याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. हडपसरला 3170, खराडीत 2023 आणि वडगाव खुर्द येथे 1071 सदनिका बांधल्या जातील. यासाठी एकूण 99 हजार 224 चौरस मीटर जागा आवश्‍यक असून, 648 कोटी रुपये खर्च येणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून 93 कोटी 96 लाख आणि राज्य सरकारकडून 62 कोटी 64 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. लाभार्थींकडून 492 कोटी 12 लाख रुपये इतकी रक्कम जमा केली जाईल. हडपसरमधील सर्व्हे नंबर 76 येथील जमीन, खराडी आणि वडगाव खुर्द येथील जमीन अद्याप महापालिकेच्या ताब्यात आली नाही. हडपसर येथील जमीन महापालिकेने टीडीआरच्या पोटी ताब्यात घेतली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT