y.jpg
y.jpg 
पुणे

कचरा संकलनाचे काम 'गजानन कृपा एंटरप्राइजेस'ला; स्थायीकडून मंजूरी

सकाळवृत्तसेवा

बालेवाडी : प्रभाग क्रमांक 9 मधील बाणेर, बालेवाडी, पाषाण सोमेश्वरवाडी या भागात कचऱ्याचे संकलन करणाऱ्या स्वच्छ संस्थेचे काम असमाधानकारक असल्याने संस्थेकडून हे काम काढून घेऊन, गजानन कृपा एटरप्राईजेस या संस्थेला हे काम देण्यात यावे या संदर्भात स्थायी समितीकडून प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

पुणे शहरात घराघरातून कचरा संकलन करण्याचे काम हे महापालिकेने स्वच्छ संस्थेला दिले आहे. त्यासाठी या संस्थेशी पाच वर्षाचा करारही केलेला आहे. या कामासाठी महापालिकेकडून या संस्थेला वार्षिक  पाच कोटी रुपये दिले जातात. परंतु बाणेर बालेवाडी पाषाण या भागांमध्ये या संस्थेचे काम असमाधानकारक असल्याचे वेळोवेळी नागरिकांच्या तक्रारी येत असल्याची दखल घेऊन या भागातील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, तसेच ज्योती कळमकर यांनी यासंदर्भात स्थायी समितीकडे या संस्थेकडून काम काढून घेऊन ते काम गजानन कृपा एटरप्राईजेस या संस्थेस देण्यात यावे या संदर्भातील  प्रस्ताव देण्यात आला होता आणि हा प्रस्ताव या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला आहे. 

नागरिकांच्या येणाऱ्या वेळोवेळी तक्रारी, त्याचंच कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढत असताना स्वच्छ चे  कर्मचारी हे प्रतिबंधित क्षेत्र 'पाटील इस्टेट' या भागात राहत असल्यामुळे अनके दिवस या  भागातील कचरा  न नेल्याने  नेल्यामुळे  नागरिक हैराण झाले होते. अशावेळी गजानन  कृपा एटरप्राईजेस या संस्थेने या भागांमध्ये कचरा संकलनाचे काम योग्य पद्धतीने केले. त्याचबरोबर ही संस्था यापुढेही पुणे  महापालिकेकडून विनामोबदला काम करण्यास तयार असून, स्वच्छ संस्थेप्रमाणे घंटागाडी आणि अन्य साहित्य त्यांना उपलब्ध करून द्यावे लागणार नाही. त्याचबरोबर गोळा केलेला ओला कचरा ज्या त्या   सोसायटीमध्ये जिरवला  जाण्याची  उपाय योजनाही या संस्थेकडून केली जाणार असल्याची माहिती शहर सुधारणा समिती अध्यक्ष, नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिली.  स्थायी समितीकडून मान्यता मिळाली असुन मुख्य सभ कडून मान्यतेची प्रतीक्षा आहे.

पुणे महापालिकेने स्वच्छ संस्थेबरोबर कचरा विलगीकरनासाठी पाच वर्षाचा करार केला आहे. त्यादृष्टीने  पुणे शहर पातळीवर स्वच्छ संस्थेकडून हे काम सुरू आहे. ज्या भागांमध्ये स्वच्छ संस्थेकडून काम केले जात नाही त्या ठिकाणी भविष्यात अशा संस्थेचा विचार केला जाऊ शकतो. -ज्ञानेश्वर मोळक, घनकचरा व्यवस्थापन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

Latest Marathi News Live Update: मनेका गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT