पुणे

स्टार एअर कंपनीकडून इंधन दरवाढीचे कारण

CD

स्टार एअर कंपनीकडून इंधन दरवाढीचे कारण
सोलापूर ते मुंबईसह ८ हवाई मार्गावरील विमानसेवा बंद; ९ सप्टेंबरला मुंबईत बैठक

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ५ ः विमान इंधनाच्या (एटीएफ) किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, म्हणून स्टार एअरने ही सेवा बंद केली आहे. सोलापूर ते मुंबई विमान सेवेसह नांदेड ते मुंबई, बेळगाव ते मुंबई तसेच गुजरात ओरिसा या राज्यातूनही विमान सेवा बंद करण्यात आल्याचे स्टार एअर कंपनीने स्पष्ट केले आहे. स्टार विमान कंपनीकडून सोलापूर ते मुंबई विमान सेवा बंद केल्या बाबतचे पत्र शनिवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे.

विमान इंधनाच्या (एटीएफ) किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे कारण देत स्टार एअरने ही सेवा बंद केली आहे. सोलापूर ते मुंबई विमान सेवेसह नांदेड ते मुंबई, बेळगाव ते मुंबई तसेच गुजरात ओरिसा या राज्यातूनही विमान सेवा बंद करण्यात आलेल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून विमान वाहतूक क्षेत्राला विविध अडचणींचा सामना करावा लागत असून, वाढत्या इंधन दराचा मोठा फटका विमान कंपन्यांना बसत आहे.
---
६० रुपयांवरून १२२ रुपये प्रतीलिटर..
फेब्रुवारी २०२६ मध्ये विमान इंधनाची किंमत सुमारे ६० रुपये प्रतिलिटर होती. सप्टेंबर २०२६ मध्ये ही किंमत वाढून सुमारे १२२ रुपये प्रतिलिटर झाली आहे. त्यामुळे तुलनेने छोटी विमान कंपनी असलेल्या स्टार एअरला वाढत्या इंधन खर्चाचा मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे कंपनीला प्रति महिन्याला मोठे नुकसान होत आहे. राज्य शासनाकडून कंपनीला विविध माध्यमातून मदत करण्यात आली असून, फंडिंग निधीत वाढ केल्यामुळे काही प्रमाणात नुकसान भरून काढण्यास मदत झाली. मात्र, इंधनाच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे सेवा सुरू ठेवणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
--
मुंबई येथे ९ सप्टेंबर रोजी बैठक
सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा स्टार एयरने बंद केल्याने त्या अनुषंगाने मुंबई येथे ९ सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या बैठकीमध्ये विमान सेवा पुन्हा सुरू करण्याच्या अनुषंगाने सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे, असे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले.

Sonam Wangchuk : तर सोनम वांगचुक भारतातील सर्वात मोठ्या आंदोलनाच्या तयारीत; सरकारने मागणी मान्य न केल्यास काय होणार?

Talegaon Dhamdhere Leopard Attack: तळेगाव ढमढेरेत दोन बिबट्यांचा गोठ्यात धुमाकूळ; ४ मेंढ्या ठार, २३ जखमी, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान

IND vs AFG : टीम इंडिया अफगाणिस्तानला घाबरलीय! माजी खेळाडूची निवड समितीवर टीका; म्हणाले, हताश होऊन उचललेले पाऊल...

Marathi News Live Updates: एकनाथ शिंदे फाऊंडेशन २ विद्यार्थ्यांचा दहावीपर्यंत सगळा खर्च करणार

Subhash Chandra: सुभाष चंद्रा यांच्यावर सीबीआयकडून फसवणुकीचा गुन्हा; 'एलआयसी'च्या तक्रारीवरुन मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT