पुणे

ग्रह-ताऱ्यांची माहिती मुलांनी घ्यावी : श्रीधर कुलकर्णी

CD

पुणे, ता. १६ : ‘‘ग्रह आणि तारे म्हणजे काय, त्यातील प्रत्येकाचे काही वेगळेपण असते का, यांसारखे प्रश्न मुलांना पडतात. ही अद्भुत माहिती ‘अब्जावधी तारे, लाखो प्रश्न : आपल्या वैश्विक भवतालाची सफर’ या पुस्तकातून मुलांनी व पालकांनी करून घ्यायला हवी,’’ असे मत नाट्यकर्मी श्रीधर कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
आकाशनिरीक्षक व खगोलविज्ञान माहिती प्रसारक सोनल थोरवे यांच्या ‘अब्जावधी तारे, लाखो प्रश्न : आपल्या वैश्विक भवतालाची सफर’ या पुस्तकाचे प्रकाशन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. बालदिनाचे औचित्य साधून शनिवार पेठेतील सुदर्शन रंगमंचावर हा कार्यक्रम झाला. अमलताश बुक्स, द नोमाड स्टारबॉर्न आणि बहुरंगी व्हिज्युअल आर्ट्‌स फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित या कार्यक्रमात थोरवे यांच्या ‘अ मिलियन क्वेश्चन्स, अ बिलियन स्टार्स’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन करण्यात आले.
या वेळी अनुवादक आणि प्रकाशक सुश्रुत कुलकर्णी म्हणाले, ‘‘बहुसंख्य लोकांना आकाश आणि अवकाश यांतील नेमका फरक माहीत नसतो. हा फरक सोप्या आणि रंजक पद्धतीने समजावून सांगण्याची गरज आहे.’’
पुस्तक लेखनामागील भूमिका स्पष्ट करताना सोनल थोरवे म्हणाल्या, ‘‘शालेय अभ्यासक्रमातून मुलांना सौरमालेची ओळख होते. मात्र, त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. सूर्याचा नेमका रंग कोणता, तारे कसे तयार होतात आणि ते वेगवेगळ्या रंगांचे का दिसतात, असे प्रश्न त्यांना पडतात. या प्रश्नांची उत्तरे मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी ‘अ मिलियन क्वेश्चन्स, अ बिलियन स्टार्स’ हे पुस्तक इंग्रजीत लिहिले. खगोलविज्ञानासंबंधी विविध संस्थांमधील मुलांशी संवाद साधताना त्यांनी विचारलेल्या प्रश्नांतून या पुस्तकाची कल्पना सुचली. त्यांचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचावीत, हा पुस्तक लेखनामागील उद्देश आहे.’’
याप्रसंगी थोरवे यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मुलांशी संवाद साधला. संजना यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात दोन बालनाट्ये सादर करण्यात आली.

लोकांना वाटलं आम्ही हरलो... तीन कोटींची फसवणुक अन् जेल, 'रंग माझा वेगळा' फेम साईशाच्या आईने सोडलं मौन, म्हणते-

Farmer Agitation : बारामती ॲग्रोची गव्हाण बंद! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; ऊसाला प्रतिटन ४२०० रुपये दर व पहिली उचल ३९०० रुपये देण्याची मागणी

Latest Marathi News Update: ठेकेदाराला क्लीन चिट, पुण्यात वॉर्डन पुरविण्याचा मार्ग मोकळा

Latur Politics: विधानसभा पराभवानंतर धीरज देशमुखांचं दमदार कमबॅक; जिल्हा बँकेवर पुन्हा वर्चस्व!

'ठरलं तर मग' बंद करा आता म्हणणाऱ्याला जुई गडकरीनेच दिलं थेट उत्तर! म्हणाली, 'तुम्हाला आवडत नसेल तर...'

SCROLL FOR NEXT